कोरोना काळात केलेल्या कामगिरीची सर्च मराठीने घेतली दखल
गुहागर : तालुक्यातील तळवली गावच्या नवनिर्वाचित सरपंच मयुरी महेश शिगवण यांना सर्च मराठी फाउंडेशन व मीडिया ग्रुपतर्फे राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार 2021 ने गौरविण्यात आले. अहमदनगर पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्याहस्ते हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण सभागृह पुणे येथे त्यांना रविवारी प्रदान करण्यात आला.
Newly elected Sarpanch of Talwali village Mayuri Mahesh Shigwan was honored with the state level Adarsh Sarpanch Award 2021 by Search Marathi Foundation and Media Group. The award was presented to him by Ahmednagar Parner MLA Nilesh Lanka at Yashwantrao Chavan Hall, Pune on Sunday.
कोरोनाची पहिली लाट सुरु झाल्यापासून तळवली ग्रामपंचायत व सौ मयुरी शिगवण यांनी त्यांच्या सहकार्याच्या साथीने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कोरोना काळात अनेक कुटुंबाना त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते. याशिवाय गावामध्ये सर्वत्र जंतूनाशक फवारणी महत्वाच्या ठिकाणी सॅनिटायझर वाटप करण्याचे काम त्यांनी केले होते. त्याचप्रमाणे अनेक गरीब व गरजूंना मदतीचा हात त्यांनी वेळोवेळी दिला आहे. सध्या तळवली सरपंचपदी त्या विराजमान असून या पदावर असतानादेखील त्यांनी लोकाभिमुख कामकाज करण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व कामाची दखल घेऊन सर्च मराठी फाउंडेशन व मिडिया ग्रुपतर्फे राज्यातील 50 निवडक सरपंचांमधून 15 सरपंच निवड करण्यात आली. त्यामध्ये सौ मयुरी शिगवण यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे नाथा हरिभाऊ शेवाळे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, कोल्हापूर येथील मातोश्री होमिओपॅथीक हॉस्पिटलच्या डॉ. पूजा चोपडे-पाटील, प्रसिद्ध महिला उद्योजीका डॉ. सुमित्रा भोसले आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.