• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी तेली आळीत सुरु होणार समाज संपर्क कार्यालय

by Ganesh Dhanawade
October 31, 2021
in Old News
19 0
0
आबलोली ग्रामपंचायतीचा जनजागृतीसाठी उपक्रम
37
SHARES
105
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ उपशाखा रत्नागिरी तालुका व जिल्हा कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकारी यांच्या बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाचे संपर्क कार्यालय तेली आळी येथील डॉ.पंकज बंदरकर यांच्या घराचे बेसमेंट भाड्याने घेऊन सुरू करण्याचा ठराव उपस्थितांच्या सहमतीने घेण्यात आला. त्याचप्रमाणे रत्नागिरी येथे शहराच्या जवळपास रत्नागिरी  येथे तेली समाज भवन करण्यासाठी जागेची पाहणी करण्यात यावी व जागा मिळाल्यास योग्य ती पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला.
In the meeting of Ratnagiri District Teli Samaj Seva Sangh sub-branch Ratnagiri taluka and all the office bearers of the district executive, various important issues were discussed and a decision was taken. It was decided to start the liaison office of Ratnagiri District Teli Social Service Association by renting the basement of Dr. Pankaj Bandarkar’s house at Teli Ali with the consent of the participants.

रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ उपशाखा रत्नागिरीच्या वतीने पुढील वर्षासाठी दिनदर्शिका प्रकाशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जाहिराती जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यासाठी राकेश आंब्रे, योगेश पावसकर,सचिन कोतवडेकर, अविनाश चव्हाण, मनोहर कोतवडेकर यांना अधिकार देण्यात आले. दर दोन वर्षांनी घेण्यात येणाऱ्या वधू वर मेळाव्यासंदर्भात चर्चेअंती प्रथम उमेदवारांची माहिती गोळा करावी व त्यानंतर मेळावा घेण्याचा निर्णय घ्यावा असे ठरविण्यात आले.त्यासाठी जास्तीत जास्त इच्छुक वधुवरांचे नोंदणी साठी फॉर्म भरून घेण्याचा निर्णय झाला. त्यासाठी किमान १००/- रुपये फॉर्म फी घेऊन नोंदणी करण्याचे ठरले आहे.
या बैठकीला रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रघुविर शेलार, कार्याध्यक्ष दिपक राऊत, सचिव संदीप पवार, खजिनदार सुरेश निंबाळकर, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक कोकण विभाग सेवा आघाडी अध्यक्ष विनायक राऊत, सेवा आघाडीचे रत्नागिरी अध्यक्ष सुभाष लांजेकर, काशीनाथ सकपाळ, सांगली सचिव निलेश सकपाळ, ठाणे जिल्हा माजी अध्यक्ष कमलाकर शेलार, रत्नागिरी तालुकाध्यक्ष संदीप नाचणकर, उपाध्यक्ष सचिन कोतवडेकर, सचिव अविनाश चव्हाण, राजापूर तालुका अध्यक्ष नरेश शेलार,संगमेश्वर तालुका सचिव हरिश्चंद्र पवार, वधू-वर सुचक समितीचे उपाध्यक्ष मनोहर कोतवडेकर, सल्लागार वसंत सकपाळ, योगेश पावसकर, महेश ठावरे, संतोष चव्हाण, पंढरीनाथ पवार, राकेश आंब्रे, सुदाम आंब्रे,मंदार कदम,राजेंद्र विभूते सांगली, अशोक नाचणकर, राहुल झगडे आदी तेली ज्ञाती बांधव उपस्थित होते. तालुका अध्यक्ष संदीप नाचणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यातेली समाज भवनदिनदर्शिकामराठी बातम्यारत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघलोकल न्युज
Share15SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.