कृतज्ञता आणि संवेदना व्यक्त करण्याची परंपरा यावर्षीही कायम राखूया…..!
गुहागर : दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना तसेच सीमेवर लढणार्या आणि कुटूंबापासुन दूर राहुन कर्तव्य बजावणार्या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता आणि संवेदना व्यक्त करण्यासाठी प्रतीवर्षा प्रमाणे यावर्षीही शिवतेज फाऊंडेशन गुहागरच्या वतीने दिपावलीच्या प्रथम दिवशी म्हणजेच वसुबारसच्या दिवशी सोमवार दि. ०१ नोव्हेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ७:०० वाजता श्रीदेव व्याडेश्वर तलाव, गुहागर येथे एक दिवा शहिदांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
This year as every year to express gratitude and sympathy to the Indian soldiers on behalf of Shivtej Foundation Guhagar on the first day of Diwali i.e. Vasubaras On monday This event will be implemented on 1st November 2021 at 7:00 pm at Sridev Vyadeshwar Lake, Guhagar.
टिव्ही किंवा वर्तमानपत्रात बातम्या पाहून केवळ हळहळ व्यक्त न करता आम्ही गूहागरवासीय जवानांप्रती असलेली कृतज्ञता व संवेदना व्यक्त करण्यासाठी कोणतेही राजकीय व सामाजिक अभिनीवेश न बाळगता एकत्र येतो, ही बाब गुहागरवासीयांनी प्रत्येक वर्षी कृतीतून दाखवून दिली आहे. यावर्षी देखील मोठ्या संख्येने आपल्या कुटुंबियांसोबत व मित्रपरिवारासहित या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे विनम्र आवाहन शिवतेज परिवारातर्फे करण्यात आले आहे.
हा उपक्रम यशस्वीतेसाठी ॲड. संकेत साळवी, श्री. निलेश गोयथळे, श्री. गणेश धनावडे, श्री. राजेंद्र आरेकर, श्री. संतोष वरंडे, श्री. विकास मालप, श्री. सुहास सातार्डेकर, श्री. अलंकार विखारे,श्री. मनोज उमेश बारटक्के, श्री. प्रभुनाथ देवळेकर, श्री. अंकुश विखारे व शिवतेज परिवार सदस्य आणि तमाम गुहागरवासीय घेत आहेत.
टिप :— पणती व तेल कार्यक्रमस्थळी शिवतेज फाऊंडेशन च्या वतीने उपलब्ध करुन देण्यात येईल.