• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय ई-परिषद संपन्न

by Ganesh Dhanawade
October 26, 2021
in Old News
17 0
0
बँकेत बनावट सोने ठेऊन १४ लाख ६३ हजाराची फसवणूक
33
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय ई-परिषद संपन्न झाली. विद्या प्रसारक मंडळ, ठाणे संचालित महर्षी परशुराम अभियांत्रिकीच्या Applied Sciences & Humanities विभागातर्फे शनिवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२१ रोजी “Advanced Materials and Applications (AMA-2021)” या राष्ट्रीय ई-परिषदेचे आयोजन करण्यात आले.
National e-conference was held at Maharshi Parashuram Engineering College, Applied Sciences & Humanities  National E-Conference “Advanced Materials and Applications (AMA-2021)” was organized on Saturday, October 23, 2021 by Maharshi Parashuram Engineering Department, Vidya Prasarak Mandal, Thane.

या ई-परिषदेचा मुख्य उदेश हा विद्यार्थी, शिक्षक, संशोधक व उद्योजक यांच्यामध्ये Advanced Materials या क्षेत्रामध्ये घडणाऱ्या नवनवीन संशोधनाची व त्याच्या वापराची माहिती करून देणे हा होता. या परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रो. एस. बी. देवसरकर मुख्य अतिथी म्हणून लाभले. तसेच या परिषदेमध्ये तज्ञ म्हणून प्रो. विकास पाटील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व प्रो. एल. एन. सिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या राष्ट्रीय ई-परिषदेसाठी शंभरहून अधिक विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी, शिक्षक, संशोधक व उद्योजकांनी सहभाग नोंदवला. या परिषदेतील प्रत्येक सहभागी सदस्याला महाविद्यालया तर्फे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच अनेक संशोधकांनी केलेल्या संशोधन कार्याचे प्रकाशन आंतरराष्ट्रीय नियतकालीकेमध्ये करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजन समितीमध्ये असलेल्या डॉ. अमित माने (संयोजक), श्री. औदुंबर पाटकर (सह-संयोजक), श्री. गणेश दिवे, श्री. रोहन गोंधळेकर, श्री. अरुण सरगर, श्री. दिपक जाधव, श्री. संभाजी लोहार यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.

Tags: “Advanced Materials and ApplicationsGuhagarGuhagar NewsMaharshi Parashuram Engineering CollegeMarathi NewsNational e-conferenceNews in GuhagarThaneVidya Prasarak Mandalटॉप न्युजठाणेडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठताज्या बातम्यापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठमराठी बातम्यामहर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयराष्ट्रीय ई-परिषदलोकल न्युजविद्या प्रसारक मंडळवेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालय
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.