• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

प्रा. बावधनकर यांच्या पुस्तकाचे उद्या प्रकाशन

by Ganesh Dhanawade
October 22, 2021
in Old News
16 0
1
प्रा. बावधनकर यांच्या पुस्तकाचे उद्या प्रकाशन
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ओघळलेले मोती; ज्ञानरश्मि वाचनालयात होणार सोहळा

गुहागर : येथील कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या सौ. मनाली बावधनकर यांनी ओघळलेले मोती हे ललिल कथांचे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन उद्या शनिवारी 23 ऑक्टोबरला गुहागरमध्ये होत आहे. तरी या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला तालुक्यातील साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे. असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखेचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर यांनी केले आहे.
Manali Bavdhankar, a professor in a junior college, has written a book of beautiful stories called ‘Oghalelele Moti’. The book is being published tomorrow, October 23 in Guhagar. However, this book release ceremony should be attended by literary lovers from the taluka. This appeal has been made by Rajendra Arekar, President of Maharashtra Sahitya Parishad Guhagar Branch.

आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या छोट्या घटनांचाही आपल्यावर चांगला वाईट परिणाम होत असतो. याचे प्रतिबिंब प्रा. मनाली बावधनकर यांनी ओघळलेले मोती या पुस्तकात शब्दबद्ध केले आहे. लोकमान्य टिळक वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांची या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखा, सार्वजनिक ज्ञानरश्मि वाचनालय आणि गुहागर न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. उद्या शनिवारी 23 ऑक्टोबरला सायंकाळी 5 ते 7 या वेळेत हा प्रकाशन सोहळा डॉ. तानाजीराव चोरगे सभागृह, ज्ञानरश्मि वाचनालय गुहागर येथे होणार आहे. दापोलीतील गझलकार प्रा. कैलास गांधी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी गुहागरच्या तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे, ज्येष्ठ साहित्यिक अरुण इंगवले,  सौ. मनिषा दामले, राष्ट्रपाल सावंत हे उपस्थित रहाणार आहेत.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarओघळलेले मोतीकनिष्ठ महाविद्यालयगझलकार प्रा. कैलास गांधीगुहागर न्यूजज्ञानरश्मि वाचनालयज्ञानरश्मि वाचनालय गुहागरटॉप न्युजडॉ. तानाजीराव चोरगे सभागृहतहसिलदार सौ. प्रतिभा वराळेताज्या बातम्यापुस्तक प्रकाशनप्रकाशनप्राध्यापिकाप्राध्यापिका मनाली बावधनकरमराठी बातम्यालोकमान्य टिळक वाचनालयलोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.