गुहागर : जोपर्यंत अधिसंख्य पदावरील सेवानिवृत्त कर्मचा-यांना पेन्शन देण्याबाबत निर्णायक निर्णय शासनाकडून होत नाही तोपर्यंत गेल्या 2 ऑक्टोबर पासून सुरू असलेले आझाद मैदानावरील आंदोलन – साखळी उपोषण सुरूच राहणार, असा निर्धार ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन रत्नागिरी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.माधुरी घावट यांनी व्यक्त केला.
Until a decisive decision is taken by the government regarding pension for the majority of retired employees. Until then, the agitation at Azad Maidan, which has been going on since October 2, will continue. This decision was expressed by Mrs. Madhuri Ghawat, District President of Organization for Rights of Human Ratnagiri Women’s Front.
दि. 24 रोजी ( उपोषणाच्या 23 वा दिवस) ‘आफ्रोह’च्या साखळी उपोषणाला बसण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील महिला आघाडीच्या 10 कर्मचारी आझाद मैदान, मुंबई येथे हजर राहणार असल्याची माहिती सौ. घावट यांनी दिली. रत्नागिरी जिल्हा परिषदेकडील तीन अधिकारी – कर्मचारी यांना अधिसंख्य पदाचे आदेश नसतानाही त्यांची पेन्शन अडविण्यात आल्याबाबत सौ.घावट यांनी खंत व्यक्त केली. महाराष्ट्रातील अनेक कर्मचारी सेवानिवृत्त वेतनापासून वंचित असून त्यांना न्याय मिळविण्यासाठी आम्ही आमचे कर्तव्य म्हणून या साखळी उपोषणात सहभागी होत आहोत, असेही त्या म्हणाल्या. मी स्वतः सौ.माधुरी घावट (जिल्हाध्यक्ष), तसेच माझ्या सोबत सौ. उषा पारशे (जिल्हा उपाध्यक्षा), श्रीमती माधुरी मेनकार (जिल्हा सचिव), सौ. मंगला रोडे, सदस्य ह्या 4 कर्मचारी उपोषणास बसणार आहेत. तसेच उपोषणकर्त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी महिला आघाडीच्या प्रतिभा रोडे, राजकन्या भांडे, लता वढाळ, गोकुळा धनी, चंद्रकला खेडकर व नंदा राणे हे सुद्धा आझाद मैदानावर माझ्यासोबत उपस्थित राहणार आहेत.