फिरती विज्ञान प्रयोगशाळेवर विज्ञान शिक्षक म्हणून निवड
गुहागर : गुहागर तालुक्यातील कौंढर काळसुर गुरववाडीतील रवींद्र खांडेकर यांची गुहागर तालुका फिरती विज्ञान प्रयोगशाळेवर विज्ञान शिक्षक म्हणून निवड झाली. गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
Ravindra Khandekar from Kaundhar Kalsur Guravwadi in Guhagar taluka was selected as a science teacher at Guhagar taluka mobile science laboratory. He was felicitated on behalf of Guhagar Taluka Maharashtra Navnirman Sena.
विज्ञान शिक्षक रवींद्र खांडेकर यांचा मनसे गुहागर अध्यक्ष विनोद जानवलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. सदर सत्कार समारंभ हॉटेल कोकणरत्न, शृंगारतळी येथे आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समिती (उत्तर रत्नागिरी जिल्हा) या नावाने प्रांतामध्ये जनकल्याण समितीच्या माध्यमातून विविध प्रकारे सेवा कार्य १९७३ पासून सुरू आहे. सेवा कार्य करताना शिक्षण, संस्कार, आरोग्य, कृषी, स्वावलंबन आणि आपली विमोचन आदी सहा आयाम निश्चित करण्यात आले. यामध्ये गुहागर तालुक्यात फिरती विज्ञान प्रयोगशाळा निर्माण करून त्यावर विज्ञान शिक्षक म्हणून रवींद्र खांडेकर यांची निवड करण्यात आली आहे.
खांडेकर हे कला शिक्षक आहेत. ते मार्गताम्हाणे येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कला शिक्षक आहेत. महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी त्यांच्या हस्तकलेतून साकारलेल्या चित्राची निवड झाली होती. त्यांनी श्री चिंतामणी संगीत कलामंच स्थापन करून एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करणार असून तरुण पिढीसाठी चांगले व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यांचा मोरया कलामंदिर असून मुर्ती कला त्यांनी जोपासली आहे. पंचक्रोशी व गावात शैक्षणिक व सास्कृतिक, सामाजिक क्षेत्रात सहभाग असतो. यावेळी खांडेकर यांनी प्रकल्प प्रमुख दिनेश जाक्कर, शिक्षण आयाम प्रमुख मनोहर पवार यांनी संधी दिल्याचे सांगितले. खांडेकर हे तालुक्यातील इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील विविध प्रयोग दाखविणार आहेत.