तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांची माहिती
गुहागर : शेतक-यांच्या अडीअडचणींचे निरसण करुन त्यांच्या हातात योग्य सातबारा मिळण्यासाठी शेतक-यांनी सातबाऱ्यावर १२ नंबरमध्ये घेत असलेल्या पिकांची नोंद दरवर्षी करणे गरजेचे आहे, असे आवाहन गुहागरच्या तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी शेतक-यांना केले.
In order to solve the problems of the farmers and get the right Satbara in their hands, it is necessary for the farmers to register the crops they are taking at number 12 on Satbara every year, Such an appeal was made by the tehsildar of Guhagar Mrs. Pratibha Warale did it to the farmers.
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्यूटर सेंटर आबलोलीच्या प्रांगणात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आबलोलीत डिजीटल स्वाक्षरीत ७/१२ मोफत वाटप विशेष मोहिम नुकतीच राबविण्यात आली. यावेळी तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे, सभापती सौ. पूर्वी निमूणकर, सरपंच तुकाराम पागडे यांचे हस्ते शेतक-यांना सातबाऱ्याचे मोफत वाटप करण्यात आले .
यावेळी शेतकरी बंधू – भगिनींना मार्गदर्शन करताना तहसिलदार सौ. वराळे यांनी ई- पिक पाणी याचे महत्व लक्षात घेता प्रत्येक खातेदारांना, शेतक-यांना ७/१२ मोफत मिळावा यासाठी शेतक-यांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. शेतक-यांनी स्वत:च्या मोबाईल मध्ये अॕप डाऊनलोड करुन ई- पिक पाणी आदी माहिती स्वत: नोंदणी करुन प्रशासनास सहकार्य करावे. यासाठी तलाठी, कोतवाल हे आपणास सहकार्य करतील. तालुक्यातील ६५ हजार खातेदारांपैकी आतापर्यंत सहा हजार नोंदणी झालेली आहे. नेटवर्क प्रॉब्लेममुळे अडथळा येत असल्याने विलंब होत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले..
यावेळी ग्रामसेवक बी.बी.सुर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य प्रमेय आर्यमाने, सदस्या सौ.मिनल कदम, सौ.भारती कदम, पोलीस पाटिल महेश भाटकर, सुयश कॉम्प्यूटरचे संचालक संदेश साळवी, मंडल अधिकारी व्हि. व्हि. मोरे, आबलोलीचे तलाठी बी. बी. राठोड,भातगावचे तलाठी ए. बी. कुळ्ये, शिरचे तलाठी डि. एन आदलींग, कुडलीचे तलाठी व्हि. व्हि. जोशी, शिवणेचे तलाठी एस. पी. जाधव,आबलोली कोतवाल प्रकाश बोडेकर, शीरचे कोतवाल पवार यांच्यासह शेतकरी दत्ताराम कदम, सुरेश पवार, विनोद पेढे, दिनेश शिंदे, मिलींद कदम, विठोबा पवार, विकास पवार, महेंद्र कदम, उपेंद्र कदम, अपर्णा कदम, कविता पवार, रजनी पवार, हर्षदा वैद्य, प्रकाश कारेकर, शुभम कारेकर, पांडूरंग पागडे, संतोष वैद्य, संतोष सुर्वे, सुरज कदम, सुनील कदम आदी उपस्थीत होते.