मनसेचे गुहागर पोलीस स्थानकाला निवेदन
गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या मागणी नुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत. तरी त्याची अंमलबाजावणी गुहागर तालुक्यात व्हावी, या मागणीसाठी गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोलीस स्थानकाला निवेदन देण्यात आले.
As per the demand made by Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray, Chief Minister Uddhav Thackeray has directed the administration to keep a record of foreigners coming to Maharashtra. However, a statement was submitted to the police station on behalf of Guhagar taluka Maharashtra Navnirman Sena demanding that it should be implemented in Guhagar taluka.
गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. गेल्या काही वर्षात तालुक्यात परप्रांतीय नागरिकांकडून चोरीच्या घटना, महिलांवर अतिप्रसंग करण्याचे प्रकारही घडले आहेत. अनेक बांधकाम व्यवसायामध्ये याच कामगारांचा अधिक भरणा असतो. तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी परप्रांतीय नागरिकांची नोंद ठेवणे गरजेचे आहे, असे मनसेचे मत आहे.
महीला विभाग अध्यक्ष मयुरी शिगवण, अंजनवेल उपविभाग अध्यक्ष स्वप्नील कांबळे, जानवळे शाखाध्यक्ष सुशांत कोळंबेकर, प्रसाद विखारे, तुषार शिरकर, सागर कोळंबेकर, मयुर शिगवण, अमित कोंळंबेकर, सिध्देश आग्रे, अक्षय बैकर, रुतिक गावनकर, स्वप्निल वनगे, राहुल रहाटे, आदित्य मुकनाक, नितेश शितप, तुषार शिरकर, नितिन कारकर, अनिकेत भुवड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.