• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांचा कोविड योद्धा सन्मान

by Ganesh Dhanawade
October 3, 2021
in Old News
18 0
0
भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांचा कोविड योद्धा सन्मान
36
SHARES
102
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : भाजपा ओबीसी मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे संतोष जैतापकर यांनी कोरोना काळात रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मदतीचा हात दिल्याबद्दल येथील खरे ढेरे भोसले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने त्यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
Santosh Jaitapkar, Ratnagiri district president of BJP OBC Morcha and a pioneer in social work, was honored as a corona warrior for his helping hand to patients and their relatives during the Corona period.

श्री. जैतापकर यांनी कोरोना काळात रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे येथे राहणाऱ्या तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णाना लागणारे सर्व सहकार्य करण्यासाठी  वैद्यकीय टीम तयार केली होती. ४०० पेक्षा जास्त रूग्णांना या टीमने सहकार्य केले. या टीममध्ये तालुक्यातील मुंबई, ठाणे, पालघर आणि गुहागर मधील २० डॉक्टर १०० परिचारिका आणि ८० इतर वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनी काम केले. तसेच गुहागरसह मुंबईतील शेकडो गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. अधिक उपचारासाठी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेणे, आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्यांचे बिले कमी करून घेणे, तसेच कोरोना प्रतिबंध साहित्याचे वाटप, महत्वाच्या ठिकाणांचे निर्जंतुकिकरण करण्याचे काम संतोष जैतापकर यांच्या माध्यमातून करण्यात आले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

Tags: BJP OBC MorchaCorona periodCorona WarriorCovid YodhaGuhagarGuhagar NewshonoreKhare Dhere Bhosale CollegeMarathi NewsNational Service Planning DepartmentNews in GuhagarpatientsRatnagiri district presidentsocial workकोरोनाकोरोनाग्रस्तकोविड योद्धाटॉप न्युजताज्या बातम्याभाजपा ओबीसी मोर्चाभाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकरमराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.