गुहागर : माटलवाडी युवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे जिल्हा परिषद आदर्श शाळा कुडली नं. 3 माटलवाडी या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
On behalf of Matalwadi Youth Foundation, Zilla Parishad Adarsh School Kudli no. 3 In this school of Matalwadi Educational material distribution program was held recently.
माटलवाडी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बबन माटल, उपाध्यक्ष सचिन थोरसे, सेक्रेटरी मोहन माटल, विजय माटल, वसंत माटल, संदीप थोरसे, सागर वनये, संदेश माटल, अविनाश माटल या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक भावनेतून प्रतिवर्षी हा उपक्रम शाळेत राबविण्याचा निर्णय घेऊन याहीवर्षी शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम राबविला. माटलवाडी युवा प्रतिष्ठान ही गेली अनेक वर्षे सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात या पंचक्रोशीमध्ये उल्लेखनीय कार्य करीत आहे. यापूर्वी अनेक वेळा जिल्हा परिषदेच्या शाळातून होणाऱ्या केंद्रस्तरीय व बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आर्थिक योगदान दिले आहे. कुडली नं.३ माटलवाडी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सुद्धा या प्रतिष्ठानने सहकार्य केले आहे. कोरोना परिस्थिती असतानाही प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपल्या देणगीतून गावातील इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे. शाळेसाठी व गावासाठी माटलवाडी युवा प्रतिष्ठान नेहमीच देत असलेल्या योगदानाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सुहास गायकवाड यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले. तसेच शैक्षणिक साहित्य वाटपाचा हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी करण्यासाठी पदाधिकारी मंडळींनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. तसेच शाळेच्या रंगरंगोटी साठी सुद्धा सहकार्य करावे असे मत व्यक्त केले.
यावेळी गावचे गावकर गंगाराम माटल, शिवराम थोरसे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा निकीता ठोंबरे, उपाध्यक्ष राजेश वनये, शिक्षक प्रमोदिनी गायकवाड, संदेश सावंत, गणेश वायचाळ यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोना परिस्थिती मुळे विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात शैक्षणिक साहित्य वाटप करून उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना घरी नेऊन साहित्य पोच करण्यात आले.