आमदार श्री. भास्करराव जाधव यांचा सापिर्लीतील आपद्ग्रस्त कुटुंबांना न्याय
गुहागर : खेड तालुक्यातील सापिर्ली गावातील आपद्ग्रस्त दिलीप पालांडे यांच्या कुटुंबाला गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांनी शासनाच्या संबंधित विभागांना खडबडून जागे करून ६ लाखाची मदत मिळून देत आ. जाधव यांनी आपद्ग्रस्त कुटुंबाला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला आहे.
Guhagar MLA Bhaskarrao Jadhav to the family of disaster victim Dilip Palande in Sapirli village 6 lakh help by waking up the departments. Jadhav brought true justice to the bereaved family
दिवस काल सोमवारचा.. ठिकाण आमदार श्री. भास्करराव जाधव यांचे कार्यालय… वेळ दुपारी साधारण एक-दिडची.. कार्यालयात त्यांना भेटण्यासाठी नेहमीप्रमाणेच प्रचंड गर्दी होती.. या गर्दीत एक साधारण वयस्क महिला आपल्या अपंग पतीला घेऊन आली होती.. चिंताग्रस्त अवस्थेत हे दाम्पत्य दरवाजात घुटमळत असल्याचे आमदार श्री. जाधव यांनी पाहिले आणि हाक मारून त्यांना आत दालनामध्ये बोलावून घेतले.. त्यांची चौकशी केली तेव्हा ते सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या खेड तालुक्यातील सापिर्ली गावातून आल्याचे आणि दिलीप पालांडे असं आपलं नाव असल्याचं त्यांनी सांगितलं.. का आला आहात? असं विचारताच त्यांची पत्नी सांगू लागली, ‘साहेब, आम्ही मुंबईत राहतो. परवांच्या २२ जुलैच्या मोठ्या पावसात दरड कोसळून आमचं, आमच्या दोन दिरांचं आणि शेजारच्या कदमांचे घर जमीनदोस्त झाले, तुमचं पुनर्वसन करू, असं सांगितलं पण अजून आमचं पुनर्वसन झालं नाही, ते लवकरात लवकर व्हावं म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. त्यावर आमदार श्री. जाधव यांनी विचारलं, तुम्हाला शासनाकडून पैसे नाही मिळाले? ती महिला म्हणाली, मिळाले ना, १० हजार रुपये मिळाले आम्हाला.. त्यांना मध्येच थांबवत आम. श्री. जाधव यांनी ‘हे पैसे नव्हेत, ती तातडीची मदत होती, तुम्हाला तुमचं घर पडलं म्हणून प्रत्येकी दीड लाख रुपये शासनाकडून मिळाले नाहीत का, असे विचारल्यावर, याची आम्हाला काहीच कल्पना नाही आणि पैसे मिळणार हेदेखील कुणी संगीतले नाही, असे ते म्हणाले. हे ऐकताच आमदार श्री. जाधव हे काहीसे अस्वस्थ झाले आणि संतप्तही. तात्काळ त्यांनी खेड तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधला आणि तिथल्या तहसीलदार-नायब तहसीलदार यांना ‘या आपद्ग्रस्त कुटुंबांचे प्रत्येकी दीड लाख रुपये अजून का देण्यात आलेले नाहीत, असा सवाल केला.. अधिकारी माहिती देताना गडबडले.. क्षणात या कार्यालयाची यंत्रणा खडबडून जागी झाली.. फायली चाळायला सुरुवात झाली.. फोनाफोनी सुरू झाली आणि अखेर ‘येत्या ३-४ दिवसांत संबंधित कुटुंबियांच्या खात्यात प्रत्येकी दीड लाख जमा होतील, असे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले.. आमदार श्री. जाधव यांनी हे जेव्हा सांगितले तेव्हा, पालांडे दाम्पत्याच्या चेहऱ्यावर आनंद अक्षरशः ओसंडून वाहू लागला.. पॅरालिसिसने ग्रस्त पालांडे आणि त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.. साहेब, आम्ही केवळ कैफियत घेऊन आलो होतो, आम्हाला हे अजिबात अपेक्षित नव्हतं की इथून जाताना आम्ही ६ लाख रुपये पदरात पाडून जाणार आहोत, असं म्हणत आमदार श्री. जाधव यांचे पुन्हा पुन्हा आभार मानत होते.. आभारसाठी त्यांचे जुळलेले कर पाहून उपस्थित सर्वच नागरिक आणि सहकाऱ्यांचाही ऊर अभिमानाने फुलला होता.. अत्यंत आनंदाने हे दाम्पत्य त्यांच्या दालनातून बाहेर पडले.