गुहागर : मायक्रोसॉफ्टच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘मायक्रोसॉफ्ट इनोव्हेंटीव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट’ या पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील मयुरेश माने, रणजित देसाई, सुलताना भाटकर यांची निवड करण्यात आली आहे.
Mayuresh Mane, Ranjit Desai and Sultana Bhatkar from Ratnagiri district have been selected for the ‘Microsoft Innovative Educator Expert’ award given by Microsoft.
वर्गातील अध्यापनात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शिक्षण पद्धतीला वेगळे आयाम देणाऱ्या शिक्षकांना मायक्रोसॉफ्टच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. यंदाच्या वर्षी रत्नसागर इंग्लिश स्कूल दहिवली बु.।। ता.चिपळूण, जि. रत्नागिरी येथील तंत्रस्नेही शिक्षक मयुरेश माने व गुरुवर्य द.ज .सरदेशपांडे अध्यापक विद्यालय राजापूर कोदवली तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी येथील तंत्रस्नेही शिक्षक रणजित देसाई यांना तसेच मिस्त्री हायस्कूल रत्नागिरी येथील उपक्रमशील शिक्षिका सुलताना भाटकर यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. मयुरेश माने यांनी मायक्रोसॉफ्टच्या विविध टूल्सचा सहाय्याने तसेच स्काईपच्या मदतीने अध्यापन कार्यात नावीन्यता आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर रणजित देसाई यांनी सुद्धा मायक्रोसॉफ्टच्या विविध शैक्षणिक साधने व स्काईप वापरुन त्याचबरोबर Flipgrid चा वापर करून अध्यापन रंजक केले आहे. मयुरेश माने यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.
श्री रणजित देसाई यांना सलग दुसऱ्या वर्षी तर विशेष म्हणजे मयुरेश माने यांना रत्नागिरी जिल्ह्यातून प्रथमच या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. देशातील व परदेशातील शाळांमध्ये ऑनलाईन पध्दतीने टिचिंग केले जात आहे. त्यासाठी मायक्रोसॉफ्टने शिक्षक व विद्यार्थ्यांना एक वेगळी अशी संधी उपलब्ध करून दिली आहे तरी सर्व शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मयुरेश माने यांनी केले आहे.