न. पं. आरोग्य सभापती अमोल गोयथळे यांचे तहसीलदार यांना पत्र
गुहागर : आधीच कोरोना संकटामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती बेताची त्यात गणेशोत्सव सण अशा वेळी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत गेली तीन महिने मिळालेली नाही. या लाभार्थ्यांना लवकरच या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशा मागणीचे पत्र गुहागर नगरपंचायतीचे आरोग्य आणि स्वच्छता समितीचे सभापती अमोल गोयथळे यांनी तहसीलदार प्रतिभा वराळे यांना दिले आहे.
Beneficiaries of Sanjay Gandhi Niradhar Yojana have not received any financial assistance from the government for the last three months. Amol Goyathale, Chairman, Health and Hygiene Committee, Guhagar Nagar Panchayat, has given a letter to Tehsildar Pratibha Varale demanding that these beneficiaries should get the benefit of this scheme soon.
शासनातर्फे निराधार लोकांसाठी संजय गांधी निराधार योजना ठेवण्यात आली आहे. सदरचे लाभार्थी हे आर्थिकदृष्टया दुर्बल आणि कोणताही आर्थिक आधार नसणारे असतात. गेली ३ महिने अशा लाभार्थ्यांना शासनाकडून लाभ मिळालेला नाही. गणपती सारख्या सणातही हे लाभार्थी वंचित राहिले आहेत. उर्वरित दिवसात सरदच्या लाभार्थ्यांना हा सण आनंदात साजरा करता यावा यासाठी शासनाकडून लवकरात लवकर हा लाभ त्यांना मिळावा यासाठी आपण आपल्या स्तरावर पाठपुरावा करुन त्यांना त्यांचा लाभ मिळवून दयावा, अशी विनंती गोयथळे यांनी केली आहे.