नगरपंचायत आरोग्य सभापती अमोल गोयथळे यांची मागणी
गुहागर : मुंबई व अन्य ठिकाणाहून गणेशोत्सवासाठी गुहागर शहरात अनेक चाकरमानी आले आहेत. या चाकरमान्यांसाठी जादाची लस मिळवी, अशी मागणी गुहागर नगरपंचायतीचे आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती अमोल गोयथळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली आहे.


Many Chakarmanis have come to Guhagar city from Mumbai and other places for Ganeshotsav. Amol Goyathale, Chairman, Health and Hygiene Committee, Guhagar Nagar Panchayat, has requested the District Health Officer to provide extra vaccine for these employees.


गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुहागर शहरामध्ये येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या जास्त आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आपण ठिकठिकाणी टेस्टींग कॅम्पही लावले आहत. परंतु हे चाकरमानी कामानिमित्त मुंबई, पुणे यासारख्या शहरात राहत असले तरीही ते मुळचे गुहागर शहरातीलच आहेत. या भावनेने त्यांचे टेस्टींगसोबत लसीकरण करुन घेणे हे ही आमची प्राथमिक जबाबदारी समजतो. तरीही आपण शहरात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी कॉविशिल्डचे ५०० डोस अधिकचे दयावेत अशी विनंती श्री. गोयथळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

