उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचा दिला शब्द
गुहागर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मार्गदर्शनानुसार नुकत्याच पार पडलेल्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांची रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील जन आशीर्वाद यात्रा चांगलीच गाजली. याच पार्श्वभुमीवर जन आशीर्वाद यात्रा संपल्यानंतर या यात्रेमध्ये सक्रिय सहभागी असणारे भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे ओबीसी सेलचे जिल्हा संयोजक संतोष जैतापकर यांनी नुकतीच मुंबई येथे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी खासदार निलेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी राणे यांनी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरता मी जिल्हाध्यक्ष डॉ.विनय नातु यांच्यामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगत भविष्यात येणार्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तोंडावरती संघटनेच्यावतीने राबविण्यात येणारे समर्थ भारत अभियान समर्थपणे राबविण्यास जैतापकर यांना सांगीतले आहे. त्याच बरोबर महाविकास आघाडीतील प्रस्थापितांना जशास तसे उत्तर देण्याकरता आपण म्हणाला त्या गोष्टीसाठी राणे कुटुंबीय आपल्या सोबत असेल असे आश्वासीतही केले आहे.


EX MP and BJP Maharashtra’s General Secretory Nilesh Rane Said, I will do my best for the overall development of North Ratnagiri district through the district president Dr. Vinay Natu. I will carry out Samarth Bharat campaigns on behalf of the organization ahead of the upcoming Zilla Parishad and Panchayat Samiti elections with the Help of Santosh Jaitapkar in North Ratnagiri.


कोकणवासीयांच्या आशीर्वादाने राणे साहेबांना केंद्रामध्ये मिळालेल्या कॅबिनेट मंत्री पदाचा फायदा करत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करून बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातु यांच्या नेतृत्वात कामाला लागुन उत्तर रत्नागीरी शत् प्रतीशत भाजपमय करण्यासाठी कामाला लागण्यास माजी खासदार आणि प्रदेश चिटणीस निलेश राणे यांनी सांगीतले आहे. यावेळी बाबा परब, गणेश कसवणकर उपस्थीत होते.

