• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कशेडी घाटातील एक टनेल आरपार खुला

by Ganesh Dhanawade
August 30, 2021
in Old News
19 0
0
कशेडी घाटातील एक टनेल आरपार खुला
37
SHARES
105
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दोन भुयारी मार्ग 2022 पर्यंत पूर्ण होऊन लोकार्पण होणार

खेड : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गातील कशेडी घाट याला पर्यायी भुयारी मार्गदेखील एक बोगदा टोकापर्यंत पूर्ण झाला असून दुसरा टनेलही पूर्ण होऊन २०२२ मध्ये लोकार्पण केले जाणार आहे. सध्या दोन पैकी एकच बोगदा आरपार खुला झाला आहे.

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चे चौपदरीकरण सुरू असून या कशेडी घाटांमध्ये रस्त्याचे चौपदरीकरण शक्य नसल्याने भारतीय पद्धतीच्या भुयारी मार्ग रस्ता करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या घाटातील प्रस्तावित ३.४४ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्याचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने स्वीकारले असून ४४१ कोटी रुपयांचा खर्च या कामे होणे अपेक्षित आहे २०१८ला अभियांत्रिकी प्रॉक्योरमेंट आणि कंट्रक्शन यांच्याबरोबर पाचशे दोन कोटी ४५ लाख रुपयांचा करार झाला आहे. कशेडी घाटातील प्रस्थावित बोगदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवताना कशेडी घाटातील एक भुयारी मार्ग आरपार तीन पदरी दोन भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. करारानुसार ७.२ किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जाचा पक्का रस्ताही प्रस्तावित असून या रस्त्याचे काम देखील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी करीत आहे. भुयारी मार्गाच्या दुतर्फा अॅप्रोच रस्ते तयार करण्यात आले आहेत आपत्काळामध्ये उपयुक्त असलेले वायुविजन सूर्याचे एक भुयारही यात समाविष्ट असून पोलादपूरच्या बाजूने पहिला अर्धा किलोमीटर अंतराच्या टप्प्यामध्ये दोन्ही भुयारी मार्गाला जोडणाऱ्या कनेक्टिव्हिटीचा भुयारीमार्ग तयार झाला असून आतील भागात युटर्न घेणाऱ्या वाहनाचा आहे. अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्याची ही सुविधा या कनेक्टिव्हिटी भुयारी मार्गाने होणार आहे. दुसऱ्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण होऊन एक वर्ष उशिराने लोकार्पण होणार आहे.

Tags: alternative subwayGuhagarGuhagar NewsInaugurationKashedi GhatMarathi NewsMumbai-Goa National HighwayNews in Guhagartunnelकशेडी घाटचौपदरीकरणटनेलटॉप न्युजताज्या बातम्यापोलादपूरभुयारी मार्गमराठी बातम्यामहामार्गमुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गरिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीलोकल न्युज
Share15SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.