• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरात मर्दा कुटुंबियांच्या मर्दाज् वस्त्रम दालनाचा शुभारंभ

by Ganesh Dhanawade
August 27, 2021
in Old News
25 0
0
गुहागरात मर्दा कुटुंबियांच्या मर्दाज् वस्त्रम दालनाचा शुभारंभ
49
SHARES
141
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : गेल्या चार पिढ्या गुहागर शहरात व्यवसाय करणारे मर्दा कुटुंब आज शहरातील नागरिकांसाठी आपल्या नव्याने सुरु केलेल्या मर्दाज् वस्त्रम या एकाच छताखाली सर्व प्रकारच्या कपड्यांचे दालन सुरु केले आहे. या भव्य दालनाचा शुभारंभ आज शुक्रवार दि. २७ ऑगस्ट २०२१ रोजी मोठ्या दिमाखात पार पडला. तसेच मर्दा कुटुंबाच्या कापड दुकानाला १०० वर्ष देखील पूर्ण झाली आहेत.
For the citizens of the city, we have started a gallery of all kinds of clothes under one roof called Marda’j Vastram. The grand opening of this gallery took place today. Also, the Marda family’s cloth shop has completed 100 years.
बी. जी. मर्दा हे गुहागर शहरातील सर्वात जुने कापड दुकान आहे. सन १९२१ मध्ये घाशिराम मर्दा यांनी या भव्य वास्तू ठिकाणी दुकान सुरु केले होते. त्यानंतर कै. जसकरण मर्दा यांनी १९६८ मध्ये व्यवसायाची सुत्रे हातात घेतली. त्याचे मुलगे सुरेश मर्दा हे १९९१ ला तर १९९६ मध्ये सुरेन्द्र मर्दा व्यवसायात आले. २००१ साली शृंगारतळी येथे मर्दा लाहोटी कलेक्शन नावाने स्वतंत्र कापड व्यवसाय सुरु केला. त्याठिकाणी मॅचिंग सेंटर, साडी विभाग, रेडिमेड विभाग, हॅडलूम विभाग असे वेगवेगळे कपड्याचे विभाग असून २० जणांना तर गुहागरच्या बी. जी. मर्दा या दालनात स्थानिक १५ तरूण-तरूणींना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
स्व.जसकरण मर्दा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश व सुरेंद्र या दोन्ही मुलांनी जुन्या कापड दुकानावर नवी वास्तू उभारण्याच्या कामाला सुरुवात केली. कोरोना महामारीमुळे इमारतीचे काम संथ गतीने सुरु होते. नव्या इमारतीमधील कापड दुकानाला मर्दाज वस्त्रम नाव ठेवायचे हे जसकरण मर्दा यांचे स्वप्न होते. मात्र, दि. ११ मे २०२१ रोजी जसकरण मर्दा यांचे निधन झाले. मर्दा कुटुंबियांना हा मोठा धक्का होता. वडिलांची स्वप्नपूर्ती सुरेश, सुरेंद्र मर्दा यांनी पूर्ण करताना आज २७ ऑगस्टपासून शहरातील नागरिकांसाठी पूर्णपणे अत्याधुनिक पध्दतीने दालन सुरु करण्यात आले आहे. या दालनामध्ये सुरेश मर्दा, प्रतिक मर्दा, मानस मर्दा काम पाहणार आहेत. लेडीज ब जेंटस् यांच्या सर्व प्रकारच्या कपड्यांच्या व्हरायटीज उपलब्ध असणार आहेत. पुर्णपणे बारकोडींग बिलींग सिस्टिम आहे.

Tags: grand gallerygrand openingGuhagarGuhagar NewsinaugurateMarathi NewsMarda’j VastramNews in Guhagarकापड व्यवसायकोरोना महामारीटॉप न्युजताज्या बातम्यादालनमराठी बातम्यामर्दा लाहोटी कलेक्शनमर्दाज् वस्त्रमलोकल न्युजशुभारंभ
Share20SendTweet12
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.