गुहागर : तालुक्यातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला. कनिष्ठ महाविद्यालयानी उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.
Shri Dev Gopalkrishna Madhyamik Vidyamandir, Junior College, Guhagar taluka, the result of class 12th was 100 percent. Junior colleges have maintained the tradition of bright results.
यावर्षीचा एच. एस. सी. बोर्ड परीक्षेमध्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व शाखांचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये कला शाखेमधून दिप्ती महाजन (८६.५० टक्के) ही प्रथाम आली. द्वितीय मयुरेश गाडगीळ (६८.६७ टक्के), तृतीय स्नेहाली म्हादे (६८.१७ टक्के), वाणिज्य शाखेमध्ये सानिका घाडे (८७.३३ टक्के) ही प्रथाम आली तर व्दितीय प्राची साटले (८६.०० टक्के), तृतीय स्वाती साटले (८५.८३ टक्के) या विद्याथ्यांनी यश मिळवले. शास्त्र शाखेमध्ये पार्थी गुढेकर (८५.१७ टक्के) मिळवून प्रथम आला. व्दितीय अथर्व मोरे (८४.३३ टक्के), तृतीय तेजस पवार (८२.६७ टक्के) गुण मिळाले आहेत.
या सर्व गुणवत्त विद्याथ्यांचा गुहागर एज्युकेशन सोसायटी व कनिष्ठ महाविद्यालयातर्फ सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे दिपक कनगुटकर, संस्थेचे सचिव संदीप भोसले, खजिनदार साईनाथ कळझुणकर, सदस्य पराग भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री. कोकरे यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष महेश भोसले व दिपक कनगुटकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी आडेकर, उपमुख्याध्यापक सुधाकर कांबळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आभार प्रा. सौ. माळी यांनी तर सुत्रसंचालन प्रा. मनाली बावधानकर यांनी केले.