नरवणमधील घटना : इंटरनेट आकार दिला नाही तर धान्य नाही
04.09.2020
गुहागर : रेशन दुकानदाराला नेटवर्कचे पैसे दिले नाहीत म्हणून माझ्या वडिलांना धान्य मिळाले नाही. अशी तक्रार नरवणचे ग्रामस्थ अमोल नाटुस्कर यांनी तहसीलदार कार्यालयात केली आहे. शिवाय घटनेचा पुरावा म्हणून वादावादीचे चित्रीकरणाची सीडी देखील अर्जासोबत जोडली आहे.
अमोल नाटुस्कर यांनी केलेल्या तक्रारीनुसार, नरवण येथील रेशन दुकानदार वसंत देऊडकर यांनी इंटरनेट कनेक्शनपोटी काही रक्कम अर्जदाराचे वडिल संजय नाटुस्कर यांच्याकडे 27 ऑगस्ट रोजी मागितली. सदरहु रक्कम जोपर्यंत देत नाही तोपर्यंत धान्य मिळणार नाही. असेही रेशन दुकानदाराने सांगितले. ती रक्कम भरण्यासाठी संजय नाटुस्कर मुलगा अमोलसोबत रेशन दुकानात आले. रक्कम भरतो मात्र पावती द्या अशी मागणी अमोलने केली. त्यावेळी पावती देण्याचे नाकारुन नाटुस्कर पितापुत्रांना दुकानदाराने शिवीगाळ केली. सदर दुकानदार ग्राहकांकडून पावती पेक्षा जास्त पैसे घेतो. वर्ष भरासाठी लागणाऱ्या रेशन स्लीपचे पैसे ग्राहकांकडून वसुल करतो. त्यामुळे योग्य ती कार्यवाही करावी अशी तक्रार नाटुस्कर यांनी केली आहे.
सदर तक्रारीबाबत तहसीलदारांकडे चौकशी केली असता आपण रजेवर असल्याने यातील काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.