• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
23 July 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोकणातील चिरेखाण व्यवसायाला परवानगी मिळावी

by Mayuresh Patnakar
September 3, 2020
in Old News
17 1
0
कोकणातील चिरेखाण व्यवसायाला परवानगी मिळावी
34
SHARES
98
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातूंचे मुख्यमंत्र्याना निवेदन

03.09.2020

गुहागर : कोकणातील चिरेखाण हा प्रमुख व्यवसाय असून त्याला परवानगी मिळावी. अशी मागणी उत्तर रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोकणातील चिरेखाण हा प्रमुख व्यवसाय असून यामध्ये अनेक परराज्यातील व परजिल्ह्यातील कामगारांचा समावेश असतो. गणपतीनंतर कोकणातील चिरेखाण व्यावसायिक महसुलकडे अर्ज करणे, रॉयल्टी भरणे, परवाना पुस्तके घेणे, कामगारांना आणणे,  त्यांची व्यवस्था करणे आदी कामांना सुरवात करतात. पाऊस कमी झाल्यावर या व्यवसायाला सुरुवात होते.
निसर्ग चक्रीवादळामुळे पडलेल्या घरांची दुरुस्ती जनतेला करायची आहे. नवीन घरे, इमारतींची बांधकामे पावसानंतर सुरु होतात. तसेच लॉकडाऊनच्या काळात अपूर्ण राहीलेली अनेक बांधकामे पूर्ण होणे बाकी आहे. या बांधकामांसाठी कोकणात सर्रास जांभा चिरा वापरला जातो. चिरेखाणींच्या उत्खननातून शासनालाही मोठ्या प्रमाणात महसुल मिळतो.
महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसायांपैकी साखर कारखाने बाहेरच्या जिल्ह्यातील कामगार येऊन सुरु होतील. परंतु कोकणातील चिरेखाण हा व्यवसाय दुर्लक्षित राहिल. तरी कोकणातील चिरेखाण हा प्रमुख व्यवसाय सुरु करण्याच्यादृष्टीने तातडीने निर्णय घ्यावा. असे निवेदन माजी आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, उद्योगमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे दिले आहे.

Tags: BJPDr Vinay natuGuhagarGuhagar NewsLatest NewsMarathi NewsMiningNews in Guhagarताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.