• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 December 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सागरी सीमा मंच आयोजित गुरुपुष्पांजली स्पर्धेचा निकाल जाहीर

by Ganesh Dhanawade
August 10, 2021
in Old News
16 0
0
वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी : सागरी सीमा मंच, कोकण प्रांत आयोजित, आभार संस्था संचलित रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळाच्या सहयोगाने कोकण विभागrय ऑनलाईन भजन रत्नांची मांदियाळी भजनसम्राटांना गुरू पुष्पांजली स्पर्धा या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून याचे प्रथमच आयोजन केले होते.
सुरक्षित किनारपट्टी, समर्थ भारत या सागरी सीमा मंचाच्या ब्रीदवाक्यानुसार सागरी किनारपट्टीवरील कलाकार व व सर्वासाठी भजन रत्नाची मांदियाळी, भजन सम्राटांना गुरु पुष्पांजली ऑनलाईन भजन स्पर्धा आयोजित केली. बक्षिस वितरणाला सागरी सीमा मंचचे द. रत्नागिरी जिल्हा संयोजक स्वप्नील सावंत, मंडळ अध्यक्ष साईनाथ नागवेकर, दादा वाडेकर, बुवा प्रवrण सावंतदेसाई, संजय मेस्त्री, एकनाथ पंडये, राकेश बेर्डे, प्रसाद राणे, वासुदेव वाघे उपस्थित होते.
पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने मच्छीमार बांधवांना व्यासपीठ मिळण्यासाठी किनारपट्टीवरील भजनी कलाकारांना सर्वांबरोबर सहभाग घेता यावा, म्हणून स्पर्धेचे पालकत्व सागरी सीमा मंचने स्वीकारले. यापुढेही असे अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत असे प्रतिपादन स्वप्नील सावंत यांनी केले. साईनाथ नागवेकर, प्रांत संयोजक संतोष पावरी यांच्या मार्गदर्शनाखाली बुवा लक्ष्मीकांत हरयाण, धनंजय मोसमकर, अनिकेत कोंडाजी, प्रसाद राणे, संजय सुर्वे, नीलेश मेस्त्री, विनायक डोंगरे, राकेश बेर्डे व सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेतली.
स्पर्धेचा निकाल असा- प्रथम- लिंगेश्वर प्रसादिक भजन मंडळ विक्रोळी, बुवा राजाराम परब, द्वितीय- विश्वकर्मा प्रसादिक भजन मंडळ, आगरनरळ, बुवा मारुती मेस्त्री, तृतीय श्रीगांगो माऊली प्रासादिक भजन मंडळ खार, बुवा संतोष लाड, उत्तेजनार्थ श्री गावदेवी प्रसादिक भजन मंडळ (बदलापूर) बुवा, अक्षय जमदरे, लक्ष्मी म्हंकाळी प्रासादिक भजन मंडळ, लांजा, बुवा भैरवी जाधव, हनुमान प्रासादिक भजन मंडळ, दापोली बुवा अनिकेत वालावलकर, श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळ कोपरखळे, बुवा ज्ञानेश्वर म्हात्रे, लिंगेश्वर प्रसादिक भजन मंडळ, कल्याण, बुवा सागर तेरसे. सर्वोत्कृष्ट लाईक (पुरुष गट) ब्रह्मदेव प्रासादिक भजन मंडळ उपळे, राजापूर, बुवा केदार कदम, नवोदित कलाकार- एकविरा आई प्रासादिक भजन मंडळ, कर्जत, बुवा गणेश चौधरी, उत्कृष्ट पखवाज वादक अभिलाश रसाळ (श्रीपती बाबा प्रसादिक भजन मंडळ पनवेल.
जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मुंबई- श्री स्वामी समर्थ भजन मंडळ भांडूप, बुवा सचिन कुडाळकर, ठाणे- स्वरश्री भजन मंडळ कल्याण, बुवा सौ. मंजिरी सावंत, मुंबई उपनगर- ग्रामदेवता प्रासादिक भजन मंडळ बुवा रुपेश पाटील, रायगड- जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ, कर्जत बुवा राजेश बोराडे, रत्नागिरी- वक्रतुंड प्रासादिक भजन मंडळ, आडिवरे, बुवा संजय तारळकर, सिंधुदुर्ग- लक्ष्मीनारायण भजन मंडळ वालावल, बुवा सूरज लोहार.
महिला सर्वोत्कृष्ट लाईक प्रथम बुवा- आलिशा अविनाश वासावे, द्वितीय क्रमांक सोमजाई प्रासादिक भजन मंडळ, वरवडे, बुवा कोमल वरवटकर, तृतीय ज्ञानेश्वर माऊली प्रासादिक भजन मंडळ गोठीवली, रायगड, बुवा कुमारी गीतांजली उमाटे, उत्तेजनार्थ आदिनाथसिद्ध महापुरुष भजन मंडळ, मालवण बुवा दिव्या गोसावी, स्फूर्ती भजन मंडळ, दिवे आगर, बुवा श्रीमती अनिता बापट, परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली पुष्पांजली भजन मंडळ, बुवा कुमारी स्वरा खरगांवकर.

Tags: GuhagarGuhagar NewsGuru Wreath CompetitionKonkan Divisional Online BhajanMarathi NewsNews in GuhagarRatnagiri District Prasadik Bhajan Mandalकोकण विभागrय ऑनलाईन भजनगुरुपुष्पांजलीटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यारत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळलोकल न्युजसागरी सीमा मंच
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.