प्रशासन व लोकप्रतिनिधींची वाट न पाहता रस्त्यावरील दरड केली बाजूला
गुहागर : तालुक्यातील भातगाव येथील खचलेला रस्ता व कोसळलेल्या दरडीमुळे तीन गावातील ग्रामस्थांसह या मार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली होती. याची कल्पना प्रशासनाला होती, तर काही लोकप्रतिनिधी सुध्दा येऊन कोसळलेली दरड पाहून गेले होते. आपली समस्या दूर होत नाही म्हणून ग्रामस्थांनी शिवसेना तालुकाप्रमुख सचिनशेठ बाईत यांना संपर्क साधला. श्री. बाईत यांनी दुसऱ्याच दिवशी जेसीबी व डंपरच्या साहाय्याने कोसळलेली दरड बाजूला हटवून रस्ता वाहतुकीस सुरळीत केला आहे. श्री. बाईत यांच्या या कामगिरीचे लोकप्रतिनिधींनी आदर्श घेण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत आहे.
For the citizens of Abloli and Panchkroshi, there is a need for Of a true people’s representative who is Detached from publicity in the form of Bait. Citizens are also expressing such expectations.
खचलेला भातगाव रस्त्याबाबत वेळोवेळी सांगूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. आगामी गणेशोत्सव सणापूर्वी रस्त्यावर कोसळलेली दरड दूर व्हावी म्हणून शेवटी गाव कमिटी अध्यक्ष अरविंद कदम व पदाधिकारी तसेच भातगाव, गोळेवाडी, कोसबीवाडी या तिन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य यांच्या झालेल्या संयुक्त सभेत शिवसेना तालुकाप्रमुख बाईत यांना मोबाईल वरून संपर्क साधून रस्त्याच्या दुरावस्थेबाबत सांगण्यात आले. श्री. बाईत यांनी दुसऱ्याच दिवशी जेसीबी व डंपरच्या साहाय्याने दरड व भराव हटवून रस्ता वाहतुकीस सुरळीत केला. त्यामुळे बंद असलेली एसटी बस सेवा पुन्हा सुरू झाली आहे. तिन्ही गावातील ग्रामस्थांची गैरसोय दूर झाल्याने समाधान व्यक्त केले आहे.
तालुकाप्रमुख बाईत यांचे राजकारणाबरोबरच लोकाभिमुख कार्यात मोठे योगदान राहिले आहे. पाणी टंचाईग्रस्त गावात वनराई बंधारे असो वा कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत, आर्थिक मदत, वैद्यकीय सेवा, तसेच नुकत्याच आलेल्या चिपळूण येथील पुरात अडकून पडलेल्या गुहागर तालुक्यातील नागरिकांना सुखरूप त्यांच्या घरी सोडणे असो या सर्व कार्यात बाईत यांचा पुढाकार राहिला आहे. आबलोली आणि पंचक्रोशीतील नागरिकांसाठी बाईत यांच्या रूपाने प्रसिद्धी पासून अलिप्त असलेल्या खऱ्याखुऱ्या लोकप्रतिनिधीची गरज आहे. तशी अपेक्षाहि नागरिक व्यक्त करत आहे.