सांगली : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासह राज्यांमध्ये महापुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 10 हजारांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी केली.
सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड अतिवृष्टी झाल्याने महापूर आला. राज्य शासनाच्या वतीने सर्व पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी दहा हजारांची मदत देण्यात येणार असून याबाबत बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील. असेही त्यांनी सांगितले. दरम्यान पुरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी दहा किलो तांदूळ, दहा किलो गहू, पाच किलो तूर डाळ आणि पाच लिटर रॉकेल मोफत देण्यात येणार असल्याची माहिती अन्न व पुरवठा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी यावेळी बोलताना दिली.