गुहागर : भारतीय जनता पार्टीचे प्रेरणास्थान, लोकनेते माजी आमदार कै. डॉ. तात्यासाहेब नातू यांंच्या स्मृतिदीनाचे औचित्य साधुन गुहागर तालुका भाजपच्यावतीने चिपळुण पुरग्रस्तांसाठी अन्नसेवा सप्ताहास सुरू करण्यात आल्याची माहिती गुहागर तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी दिली.
Bharatiya Janata Party’s inspiration, Loknete former MLA late. Guhagar taluka BJP has started food service week for Chiplun flood victims on the occasion of Dr. Tatyasaheb Natu’s memorial day, informed Guhagar taluka BJP taluka president Nilesh Surve.
चिपळुण परीसरातील भयावह पुरपरीस्थीती लक्षात घेऊन गुहागर तालुक्यतील भारतीय जनता पार्टीच्यावतीने तालुक्यातुन विवीध भागातुन आवश्यक मदत तातडीने पोहोच करण्यात आली. पाणी ओसरल्यानंतर शहर व परिसरातील खरी परीस्थीती समोर आली. ही परीस्थीती पाहता पुरग्रस्त परीसरात जेवणाचे साहीत्य दिले तरीही जेवण तयार करणे अशक्यप्राय आहे. हे लक्षात घेत जनतेला भाजपच्यावतीने “साद भाजपाची-प्रतिसाद गुहागरवासीयांचा” अशी साद घालत डॉ. तात्यासाहेब नातू यांच्या स्मृतिदीनाचे औचित्य साधत पुढील आठवडाभर तयार जेवण पुरविण्याचे नियोजन केले आहे. त्याप्रमाणे गुहागर तालुका व तालुकाबाहेरील जनतेने उदंड प्रतिसाद दिला आहे.
या मोहिमेच्या नियोजनानुसार रविवार दि. 25 रोजी 450 फुड पॅकेटचे वाटप चिपळूण पेठमाप येथे आणि 5000 लिटर पाणी चिपळुण शहरात वाटप करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, नगरसेवक निशीकांत भोजने, जिल्हा युवा मोर्च्या अध्यक्ष संतोष मालप, तालुका सरचिटणिस सचिन ओक, ऋषिकेश गोखले, दिनेश बागकर, जिल्हा सोशल मिडीया संयोजक शार्दुल भावे, विनायक सुर्वे, अमोल गोखले, समीर गावणंग, किरण गडदे, महेश भाटकर, संतोष सुर्वे, संदेश ठाकुर आदी कार्यकर्ते व गुहागरवासीय उपस्थीत होते.