कीर्तनवाडीतील सेवा मंदिर, समाज मंदिर, श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळांचे योगदान
गुहागर : तालुक्यातील कीर्तनवाडी येथील सेवा मंदिर, समाज मंदिर, श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळांच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करून मदतीचा हात देण्यात आला आहे.
Guhagar taluka at Kirtanwadi On behalf of Seva Mandir, Samaj Mandir, Shri Sant Dnyaneshwar Seva Mandal in a helping hand has been given to the flood victims in Chiplun by distributing essential items.
सामाजिक बांधिलकीतुन गुहागर मधील कीर्तनवाडी येथील सेवा मंदिर, समाज मंदिर, श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळांच्या वतीने चिपळूणातील पूरग्रस्तांना प्राथमिक मदत म्हणून आदी जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले आहे. ग्रामस्थ व तरूणांच्या सहकार्याने हे मदतकार्य केले जात आहे. चिपळूणमध्ये अजून मदतीची गरज असून तेथील जनतेच्या आवश्यक मागणी नुसार मदत करण्याचे आश्वासन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच गुहागर तालुक्यातील जनतेला चिपळूण वासीयांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.