• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा हात

by Ganesh Dhanawade
July 24, 2021
in Old News
16 0
0
महापुरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अंजनवेल, वेलदुरातून सात बोटी
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : भाजप नेते, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर भाजप व युवा मोर्चा आणि गुहागर तालुका मित्र परिवार यांच्या कडून चिपळूण मधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला आहे.
BJP leader, former MLA, district president Dr. Under the guidance of Vinay Natu, Guhagar BJP and Yuva Morcha and Guhagar Taluka Mitra Parivar have extended a helping hand to the flood victims in Chiplun.
स्वतः जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू चिपळूणात हजर राहून परिस्थिती वर लक्ष ठेवून यंत्रणा राबवत आहेत. तसेच जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा  रत्नागिरी उत्तर श्री. संतोष जैतापकर हे मुंबईतुन स्थानिक कार्यकर्त्यांकडून परिस्थितीची माहिती करून घेत आहेत. शक्य ती मदत तातडीने देण्याची तयारी  करत आहेत.
पूरग्रस्तांना प्राथमिक मदत म्हणून वेळणेश्वर व गुहागर मधून पाणी, कपडे, पुरीभाजी, धान्य तसेच वेळंब मधून बिस्कीट पुडे, पाणी,  तवसाळ, कोतळूक मधून कपडे, तांदूळ, बिस्किटे, पाणी, मेणबत्ती असे साहित्य देण्यात आले. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष श्री. निलेश सुर्वे, सरचिटणीस गुहागर तालुका सचिन ओक, सोशल मीडिया जिल्हा संयोजक रत्नागिरी उत्तर शार्दूल भावे, युवा मोर्चा गुहागर शहर उपाध्यक्ष अमोल गोखले, ऋषिकेश गोखले, दिपक मोरे, कौस्तुभ गद्रे, मंदार गुहागरकर, उदय बागकर, गणेश बागकर, उल्हास आरेकर आदी हे पूरग्रस्त भागात मदत करत होते.
चिपळूणमध्ये अजून मदतीची गरज असून तेथील जनतेच्या आवश्यक मागणी नुसार मदत करण्याचे आश्वासन डॉ. विनय नातू यांनी दिले आहे. तसेच गुहागर तालुक्यातील जनतेला तालुकाध्यक्ष सुर्वे यांनी चिपळूण वासीयांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

Tags: BJP leaderflood victimsformer MLAGuhagarGuhagar BJPGuhagar NewsGuhagar Taluka Mitra ParivarMarathi NewsNews in GuhagarPresidentYuva Morchaगुहागर तालुका मित्र परिवारगुहागर भाजपचिपळूण पूरग्रस्तजिल्हाध्यक्षजिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातूटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यामाजी आमदारलोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.