• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेलदूरच्या सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्ताचे भुस्खलन

by Manoj Bavdhankar
July 20, 2021
in Old News
20 0
0
वेलदूरच्या सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्ताचे भुस्खलन
39
SHARES
111
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मार्ग बंद झाल्याने धरणावर जाणाऱ्यांची अडचण

गुहागर : तालुक्यातील वेलदूर येथील स्वयंभू श्री सिद्धेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जल सुविधा योजनेतून सुमारे पाच लाख रुपये खर्चून तीन महिन्यापूर्वी झालेला रस्ता अतिवृष्टीमुळे खचून मार्ग पूर्णपणे बंद झाल्याची घटना घडली आहे.
The road leading to the Swayambhu Shri Siddheshwar Mandir at Veldur in the taluka, which was constructed three months ago at a cost of about Rs.5 lakhs. The road has been completely closed due to heavy rains.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा अंजनवेल जिल्हा परिषद गटाचे सदस्य विक्रांत जाधव यांच्या माध्यमातून वेलदुर येथे निसर्गरम्य अशा स्वयंभू श्री सिद्धेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी जल सुविधा योजनेतून सुमारे पाच लाख रुपये खर्चून तीन महिन्यापूर्वी रस्ता झाला आहे. सदरील रस्त्याचे काम जून महिन्यातहि सुरू होते. या मंदिराबरोबरच येथील धरणावर पावसाळ्यात आंघोळ करण्यासाठी अनेक ठिकाणाहून तरुण मंडळी येत असते. रस्ता डांबरीकरण करण्यात आल्याने वाहने घेऊन जाणे शक्य झाले होते. परंतु, गेली काही दिवस धो धो कोसळत असलेल्या पावसामुळे तीन महिन्यापूर्वी झालेल्या रस्त्यावर मोठ मोठे चर पडले आहेत. वाहनेच नाहीतर चालत जाणेही कठीण होऊन बसले आहे.

Tags: GuhagarGuhagar Newsheavy rainsLandslideMarathi NewsNews in GuhagarSwayambhu Shri Siddheshwar MandirZilla Parishad's Jal Suvidha Yojanaअतिवृष्टीजल सुविधा योजनाजिल्हा परिषदटॉप न्युजताज्या बातम्याभुस्खलनमराठी बातम्यालोकल न्युजविक्रांत जाधवविक्रांत भास्कर जाधवसार्वजनिक बांधकाम विभागस्वयंभू श्री सिद्धेश्वर मंदिर
Share16SendTweet10
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.