शाखाधिकारी गणेश भुतेकर यांनी वर्षभरात जोडले असंख्य ग्राहक
गुहागर : तालुक्यातील तळवली येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी गणेश भुतेकर यांच्या उत्कृष्ट कामामुळे बँकेच्या नव्या-जुन्या ग्राहकांना विविध योजनांचा लाभ घेणे सुलभ झाले आहे. यामुळे ग्राहकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
Due to the excellent work of Ganesh Bhutekar, Branch Officer, Vidarbha Konkan Gramin Bank at Talwali in the taluka, it has become easy for the new and old customers of the bank to avail various schemes. This is expressing satisfaction from the customers.
येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमध्ये मधील काही वर्षे बिघडलेल्या कामकाजामुळे ग्राहक विस्कळीत झाले होते. मात्र वर्षभरापासून येथील शाखाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळणारे गणेश भुतेकर यांनी येथील कामकाज पूर्वपदावर आणून ग्राहक वर्गाला दिलासा दिला आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून शेती कर्ज, किसान क्रेडिट कार्ड, व्यवसाय कर्ज, शासनमान्य योजना अतिशय उत्तमरीत्या राबवून त्यांनी बँकेच्या ग्राहकांच्या मनात बँकेविषयी आपुलकीचे नाते निर्माण केले आहे. याशिवाय ऑनलाईन सर्व्हिस, गावागावात बी.सी.पॉईंट, शैक्षणिक कर्ज व केसीसी मध्ये 30 जूनपर्यंत नुतनीकरण करणाऱ्या कर्जदाराला 6 टक्के परतावा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
बचतगटांचे पुनरुज्जीवन
शाखाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यापासून अवघ्या वर्षभराच्या कालावधीत श्री. भुतेकर यांनी सुमारे 100 बचत गटांचे पुनरुज्जीवन केले असून बचत गटांना कर्ज वाटपही केले आहे. यावर्षी 2 कोटी पर्यंत जवळपास 100 बचत गटांना कर्ज वाटप करण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय पीएमकीसान योजनेत असणाऱ्या सुमारे अडीच हजार लाभार्थ्यांच्या बँकेच्या खाते पुस्तकावरील त्रुटी दूर करण्यासाठी त्यांनी सहकार्य केले आहे. ग्राहकांना तत्पर व विनम्र सेवा, वैयक्तिक मार्गदर्शन यामुळे श्री. भुतेकर यांच्यासारख्या शाखाधिकाऱ्यांना अजूनही या ठिकाणी काम करण्याची संधी मिळावी अशी मागणी येथील बँकेच्या ग्राहक वर्गातून होत आहे.