• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दारूबंदी उठवली म्हणून बार मालकाने केली मंत्र्यांची आरती

by Ganesh Dhanawade
July 10, 2021
in Old News
16 0
0
दारूबंदी उठवली म्हणून बार मालकाने केली मंत्र्यांची आरती
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चंद्रपूर येथील प्रकार

चंद्रपूर : सहा वर्षांनंतर चंद्रपूर जिल्ह्यात मद्यालय सुरू झाली आहेत. दारूविक्री सुरू होताच मद्य विक्रेत्यांनी आपआपल्या पद्धतीने हा आनंद साजरा केला. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूविक्री उठविण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची राहिली आहे. त्यामुळे एका बार मालकाने राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे छायाचित्र बियर बार मध्ये लावून त्यांची आरती केली. वडेट्टीवार यांच्या आरतीचा हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे.
श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारू मुक्ती अभियानाच्या माध्यमातून अ‍ॅड. परोमिता गोस्वामी यांनी या जिल्ह्यात दारूबंदी आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची दखल घेत माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घोषित केली होती. ६ वर्षे दारूबंदी असल्यामुळे दारू विक्रेते अडचणीत होते. दरम्यान त्यांना दिसाला मिळाला आहे. विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील दारूबंदी उठवली आहे.
जिल्ह्यात पुन्हा एकदा अच्छे दिन आले अशी भावना दारू विक्रेत्यांनी बोलून दाखवली आहे. मागील ३ दिवसात मद्यप्रेमींनी तब्बल १ कोटींची दारू रिचवल्याची माहिती आहे, याचाच आनंद म्हणून ग्रीन पार्क बारचे मालक गणेश गोरडवार यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या छायाचित्राची आरती केली. जो आमचं पोट भरतो तोचं आमचा देव आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
वडेट्टीवार यांनी दारू विक्रेत्यांच्या जीवनात पुन्हा आनंद भरला आहे, त्यांचे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही, अशी प्रतिक्रिया गोरडवार यांनी दिली आहे. वडेट्टीवार यांच्या आरतीचा हा व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Tags: Guardian Minister of ChandrapurGuhagarGuhagar NewsMarathi NewsMinister of State for Relief and RehabilitationNews in Guhagarsocial mediaअर्थमंत्रीआपत्ती व्यवस्थापन मंत्रीटॉप न्युजताज्या बातम्यादारू मुक्ती अभियानदारूबंदीपालकमंत्रीमराठी बातम्याराज्याचे मदत व पुनर्वसन मंत्रीलोकल न्युजविजय वडेट्टीवारश्रमिक एल्गार संस्थापक अध्यक्ष
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.