गुहागर : तालुक्यातील ओंकार गुरव यांच्या यशाचे कौतुक करीत गुहागर शहर भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबाचा सन्मान केला. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे गुहागर शहर अध्यक्ष मंदार पालशेतकर, उपाध्यक्ष हेमंत बारटक्के, कौस्तुभ गद्रे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते. शहर भाजपच्या वतीने कु. ओंकार गुरव यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.
Praising the success of Omkar Gurav in Guhagar taluka, the activists of Guhagar city BJP Yuva Morcha visited his residence and honored his family. Bharatiya Janata Yuva Morcha office bearers and other activists were present on this occasion. On behalf of the city BJP, Omkar Gurav was felicitated with a shawl, coconut and a bouquet of flowers as well as gifts.
गुहागर येथील खरे ढेरे भोसले महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी कु. ओंकार विजय गुरव याने मुंबई विद्यापीठ उपकेंद्र रत्नागिरी यांच्या वतीने पार पडलेल्या वार्षिक ऑनलाईन स्नेहसंमेलनात सहभाग नोंदवत त्यामध्ये घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेमध्ये प्रथम तर कविता लेखन स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच स्टोरी मिरर या ऑनलाइन पोर्टल वर मातृदिनानिमित्त घेण्यात आलेल्या सुपर मॉम या जागतिक काव्यलेखन स्पर्धेत 14 वा क्रमांक पटकावत गुहागरचे नाव जागतिक स्तरावर नेऊन ठेवले आहे. त्याच्या या यशानंतर गुहागर शहर परिसराबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात त्याचे विशेष कौतुक केले जात आहे.
दरम्यान या सत्कारानंतर गुरव कुटुंबीयांनी सर्व संघटना नागरिकांसह शहर भाजपाचे आभार मानले आहेत. ओंकार ला सर्वत्र क्षेत्रातून शुभेच्छा मिळत आहेत.