• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 December 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका मासिकाचे ११ रोजी प्रकाशन

by Ganesh Dhanawade
July 9, 2021
in Old News
18 0
0
वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
35
SHARES
101
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने  “अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका” या मासिकाचे ऑनलाईन प्रकाशन समारंभ रविवार दि.११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती महा. अंनिस राज्य सरचिटणीस नितीन राऊत  व मासिकाचे संपादक प्रा.डॉ.नितीन शिंदे यांनी दिली.
मासिकाचे प्रकाशन ज्येष्ठ विचारवंत व  साहित्यिक डॉ.यशवंत मनोहर ( नागपूर) यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील  हे असणार आहेत. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचा विचार जनमानसात रुजवण्यासाठी,विवेकी समाज निर्मिती करणे, व्यापक समाज प्रबोधन करणे या मासिकाचा उद्देश आहे,आधुनिक काळात अशा मासिकांची गरज ओळखून समितीने हे पाऊल टाकले आहे. उत्तम जोगदंड हे कार्यकारी संपादक आहेत, तर सह संपादक प्रा.एकनाथ पाटील आहेत. प्रा. डॉ. दीपक बाविस्कर, डॉ. श्यामसुंदर मिरजकर, डॉ.  मांतेश हिरेमठ हे संपादक मंडळात आहेत. नामवंत मानस उपचार तज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटकर,सुप्रसिद्ध लेखिका संध्या नरे -पवार हे सल्लागार आहेत. व्यवस्थापकीय जबाबदारी अवधूत कांबळे सांभाळत आहे. महा अंनिसच्या फेसबुक पेज वर आणि झूम वर हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाचे संयोजन राज्य प्रधानसचिव संजय बनसोडे, सुशीला मुंडे, राज्य सरचिटणीस सुरेखा भापकर , डाॕ. ठकसेन गोराणे व कार्यकारी समिती करीत आहे.  सोशल मिडिया जबाबदारी नितीन राऊत व  नंदकिशोर तळाशीलकर हे सांभाळणार आहेत. तरी जास्तीत जास्त लोकांनी या आॕनलाईन व फेसबुक लाईव कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

Tags: Andhashraddha Nirmulan PatrikaGuhagarGuhagar NewsmagazineMaharashtra Andhashraddha Nirmulan SamitiMarathi NewsNews in GuhagarOnline publication ceremonyअंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकाअंनिसटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यामासिकलोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.