• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चोरांच्या उलट्या बोंबा; भाजप तालुकाध्यक्षांचे सेना तालुकाप्रमुखांना जोरदार प्रत्युत्तर

by Ganesh Dhanawade
August 31, 2020
in Old News
17 0
0
Nilesh Surve
34
SHARES
97
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

31.08.2020

गुहागर : भाजपच्या आंदोनलावर टिका करताना शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी विद्यामंदिरे सुरु करण्यासाठी भाजपने आंदोलन करायला हवे होते असा टोला लगावला होता. त्याला प्रत्युत्तर देताना भाजप तालुकाध्यक्षांनी ही मागणी म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा असल्याचे म्हटले आहे.
भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे म्हणाले की, कोरोना संसर्गाच्या प्राथमिक अवस्थेपासून बंद असणारी महाराष्ट्रातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे कोरोनाचे नियम पाळून उघडण्यात यावीत. याकरता भारतीय जनता पार्टीने राज्यभरात घंटानाद आंदोलन केले. या आंदोलनाला गुहागर तालुक्यातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. गुहागर तालुक्यांमध्ये 22 ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले.  कोरोना महामारी संसर्गातसुध्दा आघाडी सरकारने मदिरालये सुरु केली. मात्र सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे बंद आहेत. महाराष्ट्राच्या उच्चतंत्र शिक्षणमंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा नको. मात्र, तालुकाप्रमुखांना शाळा, विद्यालये, महाविद्यालये चालू झाली पाहिजेत. हा वैचारिक विरोधाभास हास्यास्पदच आहे. क्‍वॉरंटाईनच्या नियमाबाबत आजपर्यंत एकवाक्यता नाही. कोरोनाच्या संकटात रुग्ण तपासणीपासून उपचारांपर्यंतच्या विविध सुविधांमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्या दाखवूनही उपाययोजना होत नाही. गौरी गणपती सणाच्या पार्श्‍वभूमीवर चाकरमान्यांचे केलेले हाल जनता लवकर विसरणार नाही. मुंबईहून गावी येण्याची मुदत संपल्यानंतर टोलमाफी जाहीर केली. सर्व चाकरमानी गावात पोहोचल्यानंतर एसटी आणि ट्रेन सोडल्या. यातून किती प्रवासी आले हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. सत्तेत यांचा पक्ष, यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री तरीही  एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे सुरु करण्यासाठी यांनी भारतीय जनता पार्टीला आंदोलन करण्याचा सल्‍ला द्यायचा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान आणि शिक्षणाविषयी यांचा असलेला दृष्टीकोन याचा विचार यांचे वरिष्ठ करणार नसतील तर तालुकाप्रमुखांनी योग्य तो विचार करण्याची गरज आहे. असे सूचक विधानही  तालुकाप्रमुख सुर्वे यांनी केले.

Tags: BJPGuhagarGuhagar NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarताज्या बातम्यामराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.