मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला आहे. रुग्णसंख्येत घट होत आहे. त्यामुळे आता राज्यात १९ जुलै रोजी धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुका घेण्यात येणार आहे.
याबाबत राज्य निवडणूक आयोगाने ही घोषणा केली आहे. न्यायालयीन निर्णयानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या ५ जिल्हा परिषद, तसेच त्या अंतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी १९ जुलै २०२१ रोजी मतदान तर २० जुलै २०२१ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी काल शुक्रवारी येथे केली.