गेल इंडिया आणि वितारा एनर्जी कंपनीचा पुढाकार
मुंबई : नैसर्गिक वायू निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध गेल इंडिया तसेच ऑस्ट्रेलियातील वितारा एनर्जी कंपनी राज्यात सुमारे 16 हजार 500 कोटींची गुंतवणूक करणार आहे. याबाबतच्या सामंजस्य करारावर आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
Natural gas creation Famous in the field producer GAIL India and Australian Vitara Energy will invest around Rs 16,500 crore in the state.The MoU was signed today in the presence of Industry Minister Subhash Desai.
करार करण्यात आलेल्या कंपन्यापैकी गेल इंडिया रायगड जिह्यातील उसर येथे प्रकल्पाचा विस्तार करणार असून येथे सुमारे आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. येथील प्रकल्पात एलपीजी निर्मिती आणि वितरण, एलएनजी वायू पुनर्भरण, पेट्रोकेमिकल आदींची निर्मिती केली जाणार आहे. 2025 पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होईल, अशी माहिती कंपनीचे संचालक मनोज मेश्राम यांनी दिली. या ठिकाणी 300 वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. तसेच पाच हजार जणांना कामगार वर्गात रोजगार मिळणार आहे.
दुसरा सामंजस्य करार ऑस्ट्रेलियातील वितारा एनर्जी लिमिटेड कंपनीसोबत करण्यात आला. किमान कार्बन तंत्रज्ञानाचा वापर करून नैसर्गिक वायु निर्मितीसाठी ही कंपनी प्रसिद्ध आहे. यवतमाळ जिह्यात कंपनी प्रकल्प सुरू करणार आहे. जैवइंधन निर्मितीसोबत हॅट्रोजन, रिनिवेबल डिझल, एव्हीएशन फ्युअल, बायो सीएनजी, इथेनॉल निर्मिती आदी क्षेत्रात काम करणार आहे. पर्यावरणपूरक आणि सर्वांसाठी किफायतशीर उत्पादने निर्माण केली जातील, असा विश्वास कंपनीच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला. या प्रकल्पासाठी साडेआठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याचे कंपनीचे कार्यकारी संचालक क्लिव स्टिफन्स यांनी स्पष्ट केले. यावेळी कंपनीचे संचालक आणि सीईओ सुभाष बोस उपस्थित होते. 2022 पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वयित होणार आहे.
