भाजपा प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा वाघ
चिपळूण : भाजपा प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी चिपळूण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांना संघटनात्मक मार्गदर्शन केले. फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाले आहे असे सांगून उपस्थित पदाधिकाऱ्यांना प्रबोधन केले. तसेच त्यांनी भाजपची ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. तसेच वेळप्रसंगी भाजपा आंदोलन उभे करेल असे सांगितले.
यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस श्री रामदास राणे, तालुका अध्यक्ष विनोद भोबसकर ,शहराध्यक्ष नगरसेवक आशिष खातू, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ स्मिता जावकर,जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे,दापोली तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर,खेड शहराध्यक्ष अनिकेत कानडे,जिल्हा सरचिटणीस राजुभाई रेडीज,उत्तर रत्नागिरी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष मालप, दक्षिण रत्नागिरी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, नगरसेविका रसिका देवळेकर,नुपूर बाचीम, नगरसेवक निशिकांत भोजने, परिमल भोसले,जिल्हा चिटणीस वैशाली निमकर,युवा मोर्चा पदाधिकारी प्रणय वाडकर,युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अतुल गोंदकर,जिल्हा पदाधिकारी महेश दिक्षित, रत्नदीप देवळेकर,संजय सावंत,जयु साळवी,महिला तालुकाध्यक्ष सौ. सीमा महाडिक,प्रतिज्ञा कांबळी,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदेश ओक ,जिल्हा शिक्षक आघाडी संयोजक सोमनाथ सुरवसे सर, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस मंदार कदम,संदीप महाडिक आदी उपस्थित होते. तसेच त्यांनी चिपळूण येथील नुकत्याच घडलेल्या विपरीत गुन्ह्यातील पीडितेची घरी भेट घेऊन तिला मानसिक धैर्य दिले.