• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कौंढर काळसूर पुलाची दुरुस्ती करा

by Ganesh Dhanawade
June 23, 2021
in Old News
16 0
0
कौंढर काळसूर पुलाची दुरुस्ती करा
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सार्वजनिक बांधकाम उपविभागाला मनसेचे निवेदन

गुहागर : गुहागर तालुक्यातील कौंढर काळसूर येथील नदीचे पाणी दरवर्षी पुलावरुन वाहत असते. या पुलाची दुरुस्ती व पुलाखालील कचरा व गटारे साफ  करण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम उप विभागाच्या उपअभियंता श्रीमती सलोनी निकम यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
The river water at Kaundhar Kalsur in Guhagar taluka flows from the bridge every year. A statement on behalf of Maharashtra Navnirman Sena was given to Mrs. Saloni Nikam, Deputy Engineer, Public Works Department regarding repair of this bridge and cleaning of garbage and gutters under the bridge.
या निवेदनात म्हटले आहे की, झोंबडी गुरववाडीच्या मार्गावरील कौंढर काळसुर येथील पुलावरून नदीचे मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असते. याच पाण्यातून नागरिक व वाहनचालक ये-जा करीत असतात. पावसाळ्यात या पुलावरून पाणी जात असल्याने अतिशय जीवघेणा प्रवास करावा लागतो. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पुलाखालील कचरा तसेच गटारे साफ करावी. या पुलाच्या दुरुस्तीचे काम वेळीच करावे जेणे करून या पुलावरून पाणी जाणार नाही यासंदर्भात योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना उपअभियंता निकम यांनी सांगितले की, सदरचा पूल विशेष दुरुस्ती क गट मधून मंजूर असून सध्या पुलाखालील कचरा तसेच गटारे साफ करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करणार आहोत. ते काम काही दिवसात पूर्ण होईल असे सांगीतले. यावेळी मनसेचे गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर, माजी तालुकाध्यक्ष राजेश शेटे, तेजस पोकळे, दिनेश निवाते, वैभवी जानवळकर, कौस्तुभ कोपरकर, वनिता निवाते ,ऋतिक गावणकर ,रुपेश घवाळे,रोहित खांबे, शैलेश खांबे, विलास खांबे, सानिका मेटकर, नितीन खांबे, अजित पोकळे उपस्थित होते.

कौंढर काळसुर गुरववाडी-झोंबडीच्या मार्गातील पुलावरील जीवघेणा प्रवास

Tags: Deputy EngineerGuhagarGuhagar NewsMaharashtra Navnirman SenaMarathi NewsNews in GuhagarPublic Works Departmentटॉप न्युजताज्या बातम्यामनसेमराठी बातम्यामहाराष्ट्र नवनिर्माण सेनालोकल न्युजसार्वजनिक बांधकाम उपविभागसार्वजनिक बांधकाम विभाग
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.