भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांचे योगदान
गुहागर : भाजपा ओबीसी मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या संतोष जैतापकर यांनी उभ्या केलेल्या वैद्यकीय टीमने कोरोना काळात अग्रेसर राहून दुसऱ्या लाटेत रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या सेवेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
The medical team set up by Santosh Jaitapkar, Ratnagiri district president of the BJP OBC Morcha and a pioneer in social work, has been at the forefront of the Corona era and has given a helping hand to patients and their relatives in the second wave. Their service is appreciated from all levels.
रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे येथे राहणाऱ्या तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णाना लागणारे सर्व सहकार्य ही टीम चांगल्या प्रकारे करत आहे. या वैद्यकीय टीमचे प्रमुख मार्गदर्शक भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, शृंगारतळी येथील डॉ. राजेंद्र पवार हे प्रत्येक वेळी या सहकार्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत आहेत.
आता पर्यत ४०० पेक्षा जास्त रूग्णांना या टीमने सहकार्य केले आहे. या टीममध्ये मनोज डाफले, संदीप पिलणकर, श्री. गणेश पालकर, अनन्या गोणबरे, अंकिता कांबळे, संतोष निंबरे हे काम करत आहेत. त्यांना गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी चांगले सहकार्य केले आहे. या टीममध्ये तालुक्यातील मुंबई, ठाणे, पालघर आणि गुहागर मधील २० डॉक्टर १०० परिचारिका आणि ८० इतर वैद्यकीय सेवेतील बांधव काम करत आहेत. या संपूर्ण वैद्यकीय टीमचे तालुक्यातील जनतेने कौतुक केले.
संतोष जैतापकर हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. एकीकडे जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी कोरोना काळात जनतेकडे दुर्लक्ष करत असताना कोरोना काळात श्री. जैतापकर आणि गुहागर भाजपने अतिशय कौतुकास्पद काम केले आहे. मोफत धान्य वाटप, महत्वाच्या ठिकाणांचे निर्जंतुकिकरण तसेच कोरोना रुग्णांना व नातेवाईकांना लागेल ती मदत करण्यास आजही ही संपुर्ण टीम अग्रेसर आहे.