रत्नागिरी:- संगमेश्वर मध्ये कोरोनाचा कोणताही नवा स्ट्रेन सापडलेला नाही. नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण जिल्ह्यात नसून तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आले आहेत. राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी प्रशासनाकडून सुरू आहे अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी दिली.
No new strain of corona has been found in Sangameshwar. Not a single patient of the new strain is in the district and samples have been sent for testing. District Collector Laxmi Narayan Mishra informed that the administration is implementing the restrictions announced by the state government.
संगमेश्वर मध्ये कोरोनाचा कोणताही नवा स्ट्रेन सापडला नसल्याचा खुलासा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केला आहे. संगमेश्वरमध्ये डेल्टा सदृश्य स्ट्रेन सापडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या यावर खुलासा करण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले कि संगमेश्वर गावात वेगळा स्ट्रेन आहे का ? याची तपासणी चालू आहे. शासनाचे हे धोरण आहे. या धोरणाप्रमाणे करण्यात येणाऱ्या तपासणीत ५० ते ५२ नागरिक बाधित आढळले होते. अशा पद्धतीने सर्वच ठिकाणी म्युटेशन वर अभ्यास केला जातो. या धोरणाप्रमाणे संगमेश्वरमध्ये तपासणी होत आहे. तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.