पर्यटकांची कोरोनाची चाचणी होणार
वाई : महाबळेश्वर, पाचगणी ही राज्याची पर्यटनस्थळे प्रदीर्घ टाळेबंदीनंतर शनिवारपासून पर्यटकांसाठी खुली करण्यात येत आहेत. मात्र येथे येणाऱ्या पर्यटकांची कोरोनाची जलद चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी दिली.
साताऱ्यातील घटत्या करोना संसर्गामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंधामध्ये मोठी शिथिलता आणल्याचे जाहीर केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून महाबळेश्वर, पाचगणी ही पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आली होती.