ग्रामस्थांचे सर्वस्थरातून कौतुक
गुहागर : तालुक्यात कोरोनाचा पादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीत गेल्या दीड वर्षांत कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या महसुल गावांचा पंचायत समितीच्यावतीने नुकताच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या महसूल गावाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये गुहागर तालुक्यातील उमराठ, मास, अडुर, मुढर व कुटगिरी आदी ५ महसुल गावांचा समावेश आहे. या गावात गेल्या दीड वर्षांत एकही कोरोनाबाधित व्यक्ती सापडलेली नाही. उमराठ ग्रामपंचायतीमधील उमराठ खुर्द (आंबेकरवाडी) या महसूली गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासनाने कोरोना मुक्तीसाठी काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यामुळे हे यश मिळाले आहे. ग्रामस्थांच्या या कामगिरीबद्दल सर्वस्थरातून कौतुक होत आहे.
Guhagar taluka includes 5 revenue villages like Umrath, Maasu, Adur, Mundhar and Kutgiri. No corona virus has been found in the village in the last one and a half years. This success has been achieved due to the strict implementation of Corona Mukti by the villagers and the Gram Panchayat administration of Umrath Khurd (Ambekarwadi) in Umrath Gram Panchayat. This performance of the villagers is being appreciated from all quarters.
जिल्हयामध्ये गेले दीड वर्षे कोरोनाने थैमान घातले आहे. मागील दोन महिन्यात तर वर्षभराच्या तुलनेत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. राज्य शासनाने सुरू केलेल्या अनलॉकमध्येहि जिल्हा चौथ्या स्थानावर असतानाहि जिल्हयातील काही ग्रामपंचायतींनी कोरोनाला वेशीवर रोखण्यात यश मिळविले. त्यापैकी उमराठ ग्रामपंचायत आहे. जिल्हयात सद्या ८४६ पैकी ६५ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. उमराठ खुर्द गावाला कोरोना मुक्तीसाठी ग्रामस्थांचे उत्तम समन्वय, एकत्रितपणे मुंबईकरांना कदाचित न पटलेले. परंतु, प्रसंगी घेतलेले कारक निर्णय, त्याला स्थानिकापासून मुंबईकरांकडून मिळालेला उत्तम प्रतिसाद कारणीभूत असल्याचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी सांगितले. ही मोहिम राबविताना आंबेकरवाडीतील वटार कृती दल, वाडीकृती दल, ग्राम कृती दल याचे सदस्य तसेच कोरोना योध्दा पोलिस पाटील वासंती आंबेकर, अंगणवाडी सेविका राधा रायकर, मदतनीस निलम जोशी, आरोग्य सेविका रुचिता कदम, वाडी प्रमुख, पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थांचा मोलाचा सक्रिय सहभाग लाभला आहे. केवळ कोरोना मुक्त गावाच नव्हे तर उमराठ ग्रामपंचायत शासनाच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेत असते. येथील ग्रामस्थांनी गेली ६२ वर्षे ग्रामपंचायत बिनविरोध केली आहे. उमराठ खुर्द गावातील नगरिकांनी कोरोना मुक्तीसाठी केलेली उपाययोजना तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी नक्कीच आदर्शवत ठरणारी आहे.