गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीच्या वतीने प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. असीम कुमार सामंता यांच्या नेतृत्वाखाली जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी कंपनीच्या परिसरामध्ये शासनाचे कोविडचे सर्व नियम पाळून वृक्षलागवड करण्यात आली. या कार्यक्रमाला कंपनी मधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
On behalf of Ratnagiri Gas and Power Company at Anjanvel, the Chief Executive Officer of the project, Shri. World Environment Day was celebrated under the leadership of Asim Kumar Samanta. At this time, trees were planted in the company’s premises following all the rules of the government.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सामंता यांनी वृक्ष हे ऑक्सिजन निर्मितीचे नैसर्गिक स्तोत्र असून वातावरणातील हवा शुद्ध करण्याचे महत्वाचे काम करीत असतात. पर्यावरणाचे रक्षण म्हणजेच भविष्याचे रक्षण असून वृक्ष लागवड करून वातावरणातील ऑक्सिजन वाढण्यास मदत होईल. कोरोनाशी संघर्ष करत असताना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. परंतु, भविष्य काळासाठी हे वृक्षच आपल्याला ऑक्सिजन देऊ शकतील, असे ते म्हणाले.