केवळ 60 वर्षावरील नागरिकांसाठी लस उपलब्ध
गुहागर : गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी गुहागर नगरपंचायत हद्दीमधील नागरिकांसाठी प्रभाग निहाय लसीकरण केंद्र मिळावे अशी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नगरपंचायत हद्दीमधील 60 वर्षावरील व्यक्तीना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा शुभारंभ आज शनिवारी प्रभाग 1, 2 व 3 मध्ये करण्यात आला.
The Mayor and Chief Officer of Guhagar Nagar Panchayat had demanded to get ward wise vaccination center for the citizens of Guhagar Nagar Panchayat. Accordingly, as per the order of the Collector, immunization facility was provided to persons above 60 years of age in the Nagar Panchayat limits.


नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग 1, 2 व 3 मधील 60 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना 200 कोविशिल्ड लस उपलब्ध झाली आहे. आजपासून या प्रभागात लसीकरण सुरू झाले आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये सकाळी 10 ते 11.30 पर्यत दत्त मंदिर बाग, प्रभाग क्रमांक 2 मध्ये सकाळी 12 ते 1.30 पर्यत वरचापाट नरनारायण मंदिर, प्रभाग क्रमांक 3 मध्ये दुपारी 1.30 पर्यत दुर्गादेवीवाडी महागणपती येथे लसीकरण होणार आहे. तरी नागरिकांनी लसीकरणासाठी येताना आधार कार्ड, मोबाईल नंबर आणणे आवश्यक आहे. तसेच सोमवार दि. 7 रोजी 150 लस उपलब्ध होणार असल्यामुळे फक्त प्रभाग क्रमांक 4 मधील 60 वर्षावरील नागरिक व 60 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींना लसीकरण सकाळी 10 ते 1 पर्यत होणार आहे. उर्वरित प्रभागांसाठी लस उपलब्ध होतील त्यानुसार नियोजन जाहीर केले जाणार आहे, असे गुहागर आरोग्य विभाग व नगरपंचायत गुहागर यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.