• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

समिरा ठोंबरे हिचे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत यश

by Ganesh Dhanawade
June 5, 2021
in Old News
19 0
3
समिरा ठोंबरे हिचे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत यश
37
SHARES
105
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीचे औचित्य साधून कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत जिल्हा परिषद आदर्श शाळा कुडली नंबर ३ माटलवाडी या शाळेची विद्यार्थिनी कु. समीरा अनंत ठोंबरे हिने इयत्ता ६ ते ८ या गटामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून सुयश संपादन केले. त्याबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 
In the district level essay competition organized by Kastrib Teachers Association, District Ratnagiri, a student of Zilla Parishad Adarsh ​​School, Kudli No. 3, Matalwadi, Ku. Sameera Anant Thombre bagged the first number in the district in class 6 to 8 and achieved.
कास्ट्राईब संघटनेतर्फे तीन गटांमध्ये सदर स्पर्धा घेण्यात आली होती यामध्ये इयत्ता १ ते ५ इयत्ता ६ ते ८ व शिक्षकांसाठी खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. इयत्ता सहावी ते आठवी या गटासाठी एकूण जिल्हाभरातून एकूण ९१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार या विषयावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे परीक्षण संगमेश्वर कास्ट्राईब संघटना तालुका शाखेतर्फे करण्यात आले होते. नुकताच या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाला. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती श्री चंद्रकांत मंचेकर व जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती निशादेवी बंडगर यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. संतोष कांबळे जिल्हा सचिव श्री. संतोष मोहिते , कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कांबळे, जिल्हा नेते सिद्धार्थ जाधव, संतोष आयरे,राजेश गमरे, चंद्रमणी महाडिक, संतोष पडवणकर,अनंत कदम , संजय तांबे, महावीर कांबळे, इत्यादी मान्यवर यावेळी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. शिक्षण सभापती व शिक्षणाधिकारी यांच्यासह संघटनेच्यावतीने  सर्व स्पर्धक आणि विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले. सर्व विजेत्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम व वाचनिय पुस्तक विद्यार्थ्यांच्या शाळेत  संघटनेच्यावतीने पोहोच केले जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष यांनी यावेळी दिली. समीरा हिने जिल्हा स्तरावर संपादन केलेल्या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री.जगदाळे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती पटेल, श्रीमती भागवत, केंद्रप्रमुख श्री. लोहकरे कुडली ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती चैतनी शेट्ये, ग्रामसेवक कुळे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा निकिता ठोंबरे, उपाध्यक्ष राजेश वने, मुख्याध्यापक सुहास गायकवाड, पदवीधर शिक्षिका प्रमोदिनी गायकवाड सहकारी शिक्षक संदेश सावंत व गणेश वायचाळ यासह सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarकास्ट्राईब शिक्षक संघटनाटॉप न्युजताज्या बातम्याभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर]मराठी बातम्यामहाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटनालोकल न्युजशाळा व्यवस्थापन समिती
Share15SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.