• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तळवलीत माझी रत्नागिरी माझी जबाबदारी अंतर्गत सर्वेक्षण

by Ganesh Dhanawade
May 4, 2021
in Old News
17 0
0
तळवलीत माझी रत्नागिरी माझी जबाबदारी अंतर्गत सर्वेक्षण
34
SHARES
97
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : माझी रत्नागिरी माझी जबादारी अंतर्गत कोविड 19 सर्वेक्षण पथकामार्फत तळवली गावात सर्वेक्षण मंगळवार आजपासून सुरू झाले आहे.
My Ratnagiri my responsibility Survey through Covid 19 survey team under starts from today in Talwali village.

सद्या तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तळवली परिसरातदेखील काही रुग्ण आढळून आल्याने खबरदारी म्हणून ग्रामपंचायत व ग्रामकृतीदल व वाडी कृतीदलाकडून वाडीस्तरावर भेटी देऊन कोरोनाबाबत जनजागृतीचे व खबरदारी घेण्याचे वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. तसेच माझी रत्नागिरी माझी जबाबदारी अंतर्गत सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून दि.1 ते 15 मे पर्यंत ही मोहीम राबविण्यात येत आहे. तळवली गावात एकूण तीन वॉर्ड असून वॉर्ड प्रमाणे तीन गट करण्यात आले आहेत. यामध्ये शिक्षक, आशा सेविका, ग्रामपंचायत सदस्य, वाडी कृतीदल सदस्य ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी हे प्रत्येक कुटुंबाला भेटी देऊन प्रत्येकाची ऑक्सीजन लेवल व तापमान चेक करणार आहेत. यावेळी पर्यवेकक्षिका सौ हळये मॅडम हजर होत्या. तरी सर्व ग्रामस्थांनी या सर्वेक्षणाला सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायत तळवलीच्यावतीने करण्यात आले आहे.

Tags: CoronaCorona In GuhagarCorona NewsCovid19GuhagarGuhagar NewsMarathi NewsMy Ratnagiri my responsibilityNews in Guhagarकोरोनाकोरोना बातम्याकोविड केअर सेंटरगुहागरातील कोरोनाटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यामाझी रत्नागिरी माझी जबाबदारीलोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.