रियाज ठाकूर यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
गुहागर :सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. यामध्ये जनतेला पॉस मशीनद्वारे रास्त धान्य न देता ऑफलाइनने धान्य वितरण करावे असे निवेदन गुहागर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रियाजभाई ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
सध्या कोरोनाचा गुहागर सह जिल्ह्यात रेषो वाढत चालला असून पॉस मशीन द्वारे रास्त धान्य जनतेला देणे धोकादायक आहे. या मशीनवर अनेकांचे अंगठे द्यावे लागतात. कोरोनाच्या रोगापासून सावधगिरी बाळगून या करिता ऑफलाइन धान्य वितरण करावे अशी मागणी केली आहे तसेच सध्या रमजान महिना असल्यामुळे येथील जनतेला रास्ता दुकानावर गेल्यावर नेटवर्क नसेल तर ताटकळत बसावे लागते. त्यामुळे ऑफलाईन ने धान्य वितरण केल्यास ताटकळत बसावे लागणार नाही यामुळे शासनाने ऑफलाइन धान्य देण्याची सुविधा करावी असे ठाकूर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.