गुहागर : गुहागर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व निर्मलक्ष फाऊंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष जैतापकर यांचा नुकताच मुंबई येथे श्री पाणबुडी देवी कलामंचातर्फे विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री पाणबुडी देवी कलामंचाचे उपाध्यक्ष रमेश भेकरे व सचिव रमेश कोकमकर यांनी शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन संतोष जैतापकर यांचा सत्कार केला. श्री. जैतापकर हे गुहागर तालुक्यातील सुपूत्र आहेत. राजकारणापेक्षा पहिले समाजकारण करण्यासाठी त्यांचे प्रथम प्राधान्य असते. तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान आहे. तसेच मुंबईतहि तळमळीने काम करणारे कार्यकुशल नेतृत्व संतोष जैतापकर यांच्या या कार्याबद्दल श्री पाणबुडी देवी कलामंचा तर्फे विशेष सत्कार करण्यात आला. श्री पाणबुडी देवी कलामंचासोबत मी सदैव असून प्रत्येक वेळी माझं सहकार्य असेल असे सांगून श्री. जैतापकर यांनी सर्वांचे आभार मानले.