राष्ट्रवादीचे गुहागर शहराध्यक्ष मंदार कचरेकर यांची वरिष्ठांकडे मागणी
गुहागर : गुहागर नगरपंचायत निवडणुकीत एकहाती सत्तेवर आलेल्या गुहागर शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षासह उपनागराध्यक्ष व अन्य नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाले आहेत. नोव्हेंबरमध्ये उपनगराध्यक्षा पदाचा अडिच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. राष्ट्रवादीसोबत ठरल्याप्रमाणे सलग दोन टर्म निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुजता बागकर यांना उपनगराध्यक्ष पद देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे गुहागर शहराध्यक्ष मंदार कचरेकर यांनी केली आहे. याबाबत पक्षाच्या वरिष्ठांकडेहि त्यांनी मागणी केली आहे.
गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत आ. भास्कर जाधव यांचा पराभव करत गुहागर शहर विकास आघाडीने सत्ता काबीज केली होती. यात राष्ट्रवादीच्या सुजता बागकर या एकमेव नगरसेविका निवडून आल्या होत्या. सलग दोनवेळा त्या या भागातून नगरसेविका म्हणून निवडन आल्या आहेत. दरम्यान, जाधव यांनी सेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीचे असणारे विद्यमान नगराध्यक्षा राजेश बेडल, उपनगराध्यक्षा स्नेह भागडे यांच्यासह काही नगरसेवक पुन्हा खा. सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षात सक्रिय झाले. यावेळी त्याच्यासमोर दोन अटी ठेवण्यात आल्याची आठवण शहराध्यक्ष मदार कचरेकर यांनी करून दिली आहे.
गुहागर शहर विकास आघाडीने लवकरात लवकर राष्ट्रवादीमध्ये सक्रिय व्हावे तसेच नगरसेविका सुजता बागकर यांना उपनगराध्यक्ष पदी संधी देण्यात यावी असे ठरले आहे. दरम्यान, उप नगराध्यक्ष यांची अडिच वर्षांची मुदत संपून चार महिने झाले तरी कोणतीच कार्यवाही न झाल्याने याबाबत पक्षाच्या वरिष्ठांकडे आपण कळविले असल्याचे श्री. कचरेकर यांनी सांगितले.
संबंधित बातमी
उपनगराध्यक्षाबाबत कोणतीच चर्चा झालेली नाही