• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तरुण उत्साही मंडळाच्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे वितरण

by Ganesh Dhanawade
March 18, 2021
in Old News
16 0
0
तरुण उत्साही मंडळाच्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे वितरण
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

खुल्या गटात दिव्या महाडिक तर माध्यमिक गटात शुभ्रा रसाळ प्रथम

गुहागर : गुहागर तालुक्यातील वरवेली येथील तरुण उत्साही मंडळ वरवेली तेलीवाडी आयोजीत रत्नागिरी जिल्हा तेली ज्ञाती बांधव मर्यादित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण कार्यक्रम महाशिवरात्री उत्सवानिमित्त श्री काशी विश्वेश्वर मंदिरात पार पडला. माध्यमिक व  खुल्या गटात घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील ६६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
माध्यमिक गट – ( विषय – शिवरायांचे बालपण , शिवरायांची आग्र्याहून सुटका ) – प्रथम क्रमांक शुभ्रा सुनील रसाळ. (नेवरे ता.रत्नागिरी) ,द्वितीय भक्ती विश्वनाथ महाडिक (लोटे, ता. खेड), तृतीय तन्वी विनायक झगडे (अडूर ता. गुहागर )त यांनी तर खुला गट –  ( विषय – शिवरायांची न्यायव्यवस्था हिंदवी स्वराज्याची स्थापना ) –  प्रथम क्रमांक दिव्या गजानन महाडिक,(कळबस्ते, ता. चिपळूण) द्वितीय प्रीतम लहु पवार (धोपावे, ता. गुहागर), तृतीय क्रमांक अश्विनी अनिल किर्वे (वरवेली ता. गुहागर )या स्पर्धकांनी प्राप्त केले. या सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र व रोख पारितोषिक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला दीपक विचारे, संतोष देसाई, दशरथ किर्वे, प्रभाकर किर्वे, गणेश किर्वे, बळीराम पवार, दीपक किर्वे, संतोष किर्वे, निलेश रसाळ, ग्रामपंचायत सदस्य दिव्या किर्वे, रश्मी किर्वे, रेश्मा रसाळ, गजानन महाडीक आदी उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या आकाश किर्वे श्रावणी रहाटे, सिद्धेश किर्वे, आदित्य किर्वे, जन्मेश किर्वे, स्नेहल पवार, रुचिता किर्वे मनस्वी किर्वे, सुशांत रसाळ व इतर सहभागी स्पर्धकांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षण दीपक विचारे व अनिल अवेरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  संतोष किर्वे यांनी केले.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजतरुण उत्साही मंडळ वरवेली तेलीवाडीताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजवक्तृत्व स्पर्धा
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.