विविध विषयांवर चर्चा
गुहागर : रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी येथे पार पडली. संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्ती पूजनाने सभेची सुरुवात करण्यात आली.
सभेसाठी रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाचे अध्यक्ष रघुवीर शेलार,कार्याध्यक्ष दीपक राऊत,खजिनदार सुरेश निंबाळकर,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक सेवा आघाडीचे अध्यक्ष विनायक राऊत, रत्नागिरी तालुकाध्यक्ष संदीप नाचणकर, संगमेश्वर तालुकाध्यक्ष संतोष पावस्कर,गुहागर तालुकाध्यक्ष शशिकांत पवार, राजापूर तालुका अध्यक्ष नरेश शेलार,लांजा तालुकाध्यक्ष प्रकाश लांजेकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कल्पना लांजेकर, वधू-वर सूचक मंडळ अध्यक्ष प्रकाश शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेच्या प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी कोरोना आपत्तीच्या काळात प्रलंबित विविध उपक्रम आणि आगामी काळात आयोजित करावयाचे उपक्रम याविषयी मार्गदर्शन केले. कार्याध्यक्ष दीपक राऊत यांनी मागील सभेचे इतिवृत्त, जमा-खर्च वाचन केले. संघटनेच्या रिक्त झालेल्या सरचिटणीस पदी संदीप हरिचंद्र पवार यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचा राज्यव्यापी कार्यकर्ता मेळावा नाशिक या ठिकाणी होत असून सदर मेळाव्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून जाणा-या कार्यकर्त्यांबाबत नियोजन करण्यात आले.कोकण विभागीय सेवा आघाडीचे अध्यक्ष विनायक राऊत यांनी कार्यकर्त्यांना नाशिक येथील राज्यव्यापी मेळाव्याचे महत्व पटवून दिलेे.जिल्हा संघाचे आजीव सभासद संख्या वाढवणे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सभासदत्व स्वीकारणे, जिल्हा सेवा संघासाठी स्वमालकीची जागा उपलब्ध करणे, वधू-वर मेळाव्याचे आयोजन करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन अमोल पवार यांनी केले तर कार्याध्यक्ष दीपक राऊत यांनी आभार मानले.या सभेसाठी जिल्हा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी,सर्व तालुक्यांचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.